Police Commissioner Riteshkumar sakal
पुणे

Pune Police Commissioner : पुणेकरांना चांगल्या कामाचे प्रचिती देऊ - रितेशकुमार

अमिताभ गुप्ता यांच्यानंतर पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी कोण? या प्रश्‍नावरुन मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या चर्चेला अखेर पुर्णविराम मिळाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अमिताभ गुप्ता यांच्यानंतर पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी कोण? या प्रश्‍नावरुन मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या चर्चेला अखेर पुर्णविराम मिळाला आहे.

पुणे - अमिताभ गुप्ता यांच्यानंतर पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी कोण? या प्रश्‍नावरुन मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या चर्चेला अखेर पुर्णविराम मिळाला आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी रितेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने मंगळवारी रात्री उशीरा याबाबतचे आदेश काढले. "पुणेकरांना चांगल्या कामाची प्रचिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करु' असा विश्‍वास रितेशकुमार यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला आहे.

शहरातील संघटीत गुन्हेगारीसह उदयोन्मुख गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्याचा (मोका) वापर करुन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारांवर वचक बसविला होता. "मोका', एमपीडीए' यांसारख्या कायद्यांचा योग्य वापर करीत शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. एकीकडे गुन्हेगारीवर नियंत्रण बसविण्यास यश येत असतानाच, दुसरीकडे वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यामध्ये गुप्ता यांना अपयश आले होते. त्याची सल गुप्ता यांना होती, दरम्यान, त्यांनी दोन महिन्यांपुर्वी वाहतुक शाखेमध्ये मोठे फेरबदल करुन, तसेच नव्याने आलेल्या पोलिस उपायुक्तांना रस्त्यावर उतरुन वाहतुक शाखेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्याला आता यश येऊ लागले होते. दरम्यान, गुप्ता यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात पुर्ण झाला होता. तेव्हापासून त्यांच्या बदलीबाबत चर्चा सुरु होती. या चर्चेला मंगळवारी रात्री पुर्णविराम मिळाला.

पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने याबाबतचे आदेश मंगळवारी रात्री काढले. त्यावेळी 'सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला. रितेशकुमार म्हणाले, 'पुण्याच्या पोलिस आयुक्त पदी नियुक्ती झाल्याची माहिती मिळाली. त्याचा नक्कीच आनंद झाला. पुण्यात काम करणे कधीही चांगले वाटते. आपल्याला जास्त कष्ट करण्याची सवय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मेहनत करुन पुणेकरांना आपल्या चांगल्या कामाची प्रचिती नक्कीच देऊ. मी सध्या सुट्टीवर आहे. दोन तीन दिवसात पुण्यात येईल.'

रितेशकुमार हे भारतीय पोलिस सेवेच्या (आयपीएस) 1992 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. ते काही वर्षे औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक होते, त्यानंतर त्यांनी कोल्हापुर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक म्हणूनही काम पाहिले. तेथून रितेश कुमार यांची बदली राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस महानिरीक्षकपदी झाली. तर त्यानंतर ते पदोन्नतीने राज्य वायरलेस विभागाच्या अतिरीक्त पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत होते. तेथे त्यांनी वायरलेस विभागामध्ये अनेक चांगली कामे केली. दरम्यान, तेथून ते राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या अतिरीक्त पोलिस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली होती. तर "सीआयडी'नंतर त्यांची पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi Mumbai Tour: सचिन तेंडुलकरसोबत भेट ते प्रदर्शनीय सामना... लिओनेल मेस्सीच्या मुंबई दौऱ्याचे अपडेट्स एका क्लिकवर

Tips For JEE Main Preparation: 12वी बोर्ड परीक्षेसोबत JEE Main ची तयारी कशी करावी? जाणून घ्या एक्सपर्टकडून

Latest Marathi News Live Update: १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सुरुवात

Viral Video: खरा तो एकची धर्म ! महिलेने स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी सकाळी केलं असं काही... नेटकऱ्यांकडून होतेय प्रशंसा

IPL 2026 Auction पूर्वी मोठा 'खेला'! जो ऑलराऊंडर सर्वात महागडा ठरू शकतो, त्याची फक्त फलंदाज म्हणून नोंदणी; कुणी केला गेम?

SCROLL FOR NEXT