पुणे

‘आरएमसी’ वाहनांच्या नियमांत मोठे बदल

CD

पुणे, ता. १७ : शहरातील रस्त्यांवर जड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी आरएमसी (रेडीमिक्स काँक्रीट) मिक्सर वाहनांसाठी वाहतूक नियमांत बदल केले आहेत. बुधवार, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी सकाळी गर्दीच्या वेळेत वाहतुकीच्या नियमांत शिथिलता देण्यात आली आहे.
‘आरएमसी असोसिएशन’समवेत झालेल्या संयुक्त बैठकीतील ठरावानुसार वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी हा नवा आदेश काढला. हा बदल एका महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर लागू राहील. या अधिसूचनेत हायवा, डंपर, ट्रक यांसारख्या इतर जड वाहनांच्या वाहतुकीत कोणताही बदल किंवा शिथिलता देण्यात आली नाही, असे वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
शहरातील प्रमुख मार्गांवरील अंतर्गत भागात काही चौकांपासून पुढे अंतर्गत भागात आरएमसी वाहनांना प्रवेश बंदी राहील. या नियमांचे फलक सात दिवसांत महापालिकेकडून संबंधित भागात लावून घेण्याचा आदेश वाहतूक विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिला आहे.

नवे नियम आणि अटी -
१) सुटीच्या दिवशी शिथिलता : बुधवार, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी सकाळी ‘पीक अवर्स’मध्ये वाहतुकीत शिथिलता असेल. मात्र, सायंकाळच्या पीक अवर्समधील निर्बंध पूर्वीच्या अधिसूचनेप्रमाणेच राहतील.
२) ‘रेड झोन’साठी नियम : शहराच्या मध्यवर्ती भागातील ‘रेड झोन’मध्ये वाहतूक विभागाची पूर्वपरवानगी घेतलेल्या आरएमसी वाहनांना शनिवार, रविवार व सरकारी सुटीच्या दिवशी सकाळी सूट असेल, मात्र सायंकाळचे निर्बंध बंधनकारक राहतील.
३) सुरक्षा उपाय : सर्व आरएमसी वाहनांवर ३६० डिग्री कॅमेरे बसवणे किंवा वाहनासोबत क्लिनर ठेवणे बंधनकारक आहे. यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे.
४) डस्ट डायव्हर्टर (डीडी) मशीन अनिवार्य : प्रत्येक आरएमसी प्लांटधारकांनी ‘डीडी’ मशीन ठेवणे बंधनकारक असून, प्लांटमधून मिक्सर वाहन बाहेर पडताना या मशीनद्वारे तपासणी करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Sharma: प्रभासच्या चित्रपटाच्या सेटवर अपघात! बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते राजेश शर्मांना विषारी कीटकाचा दंश; प्रकृती गंभीर

Pune News : अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण अभियंत्याच्या कुटुंबाला दिलासा; विमा नसलेल्या ट्रकच्या मालक-चालकाला भरावी लागणार दीड कोटींची भरपाई

Khed Tehsil Heavy Rain : सतारकावस्तीकडे जाणारा पूल खचल्याने ५०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर संकट

Gas Cylinder : खारपाडा येथे नदीत व खाडीत सिलिंडरचा पूर; हजारो गॅस सिलिंडर पाण्यात आले वाहून, चक्क बोटीने सिलेंडर काढले बाहेर

Pune Investment Scam: बांधकामात गुंतवणुकीचे आमिष; केबल व्यावसायिकाची ४० लाखांची फसवणूक, चतुःश्रृंगी पोलिसांत गुन्हा

SCROLL FOR NEXT