school sakal
पुणे

Pune News : महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांच्या 500 जागा रिक्त; 'यामुळे' प्रशासनही हतबल

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुणे महापालिकेच्या शाळांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेशे शिक्षक नसल्याने शैक्षणिक गुणवत्तेचा व विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पुणे महापालिकेतील एकूण शिक्षकांच्या जागांपैकी ७२७ जागा रिक्त होत्या. आंतरजिल्हा बदलीतून महापालिकेला २१९ शिक्षक प्राप्त झाल्याने अद्यापही ५०८ जागा रिक्त आहेत. पण शासनाकडून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रियाच केली जात नसल्याने महापालिका प्रशासन देखील हतबल झाले आहे.

पुणे महापालिकेच्या शहरात मराठी, उर्दू, कन्नड, इंग्रजी माध्यमाच्या मिळून एकूण २८४ शाळा आहेत. या ठिकाणी बालवाडी पासून ते इयत्ता १०वी पर्यंत शिक्षण दिले जाते. शहरातील ९३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या शाळेमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.

या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसह इतर सुविधा मिळाव्यात यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असतात. वर्गखोल्या वाढविण्यासाठी भवन विभागातर्फे तरतूद केली जाते. गेल्या काही वर्षापासून इ लर्निंग, विविध प्रकारच्या प्रयोगशाळा, क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यावरही महापालिकेचा भर आहे. या गोष्टींवर भर असला तरीही विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षक नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

गेल्या काही वर्षापासून महापालिकेच्या शाळेतील शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी नव्याने शिक्षक भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्त जागांची संख्या वाढत गेली आहे. त्यातच महापालिकेत हद्दीलगतची ३२ गावे समाविष्ट झाल्यानंतर तेथील रिक्त जागांमुळे ही संख्या वाढली आहे.

महापालिकेच्या जुन्या हद्दीतील शाळांमधील शिक्षकांच्या ३१७ जागा रिक्त आहेत, तर समाविष्ट गावातील रिक्त जागांची संख्या ३५० इतकी आहे. गेल्या दीड वर्षात महापालिकेकडे २१९ आंतरजिल्हा बदल्यांचे प्रकरणे आली होती. त्यास नुकतीच महापालिका प्रशासनाने मान्यता दिली. त्यामुळे येत्या काळात महापालिकेकडे २१९ शिक्षक उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रिक्त जागांची संख्या घटून ७२७ वरून ५०८ इतकी झाली आहे. पण अद्याप यातील अनेक शिक्षक महापालिकेकडे रुजू झालेले नाहीत.

‘‘महापालिकेच्या शाळांमधील ७२७ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, तेथे आंतरजिल्हा बदलीतून २१९ शिक्षकांना मान्यता दिली आहे. त्यामुळे रिक्त जागा कमी होणार असल्या तरीही ५०८ जागा अजूनही रिक्त आहेत. शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केली जाते. पण त्यांच्याकडून लगेच शिक्षक मिळतील अशी स्थिती नाही.’’

- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

‘‘मराठी माध्यमाचे १६७२ तर इंग्रजी माध्यमाचे ३५० शिक्षक आहेत. अनेक इंग्रजी शाळांना मुख्याध्यापक, पर्यवेक्षक नाहीत. तसेच वरिष्ठ वेतन श्रेणीचाही प्रस्ताव रखडलेला आहे. महापालिकेने लवकरच नवे शिक्षक भरती करताना हे प्रश्‍न मार्गी लावावेत.’’

- सचिन डिंबळे, राज्याध्यक्ष, महापालिका, नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT