पुणे

पुणे जिल्ह्यात ९९ गावांत निवडणूक

सकाळवृत्तसेवा

पुणे - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काटेवाडी (ता. बारामती), माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांचे निरगुडसर (ता. आंबेगाव), जुन्नरचे आमदार शरद सोनवणे व जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शरद लेंडे यांचे पिंपळवंडी (ता. जुन्नर), जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांचे बुचकेवाडी (ता. जुन्नर) आदी नेत्यांच्या गावांसह ९९ गावांच्या ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. यात आपापल्या गावाचा गड राखण्यासाठी या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. 

आज अधिसूचना
पंचवार्षिक निवडणूक येत्या २६ डिसेंबरला होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना शुक्रवारी (ता. २४) प्रसिद्ध होणार आहे. 

अधिसूचनेनंतर लगेचच आचारसंहिता लागू होणार आहे. ५ डिसेंबरपासून तालुक्‍याच्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. प्रमुख नेत्यांच्या गावांसह वाघोली (ता. हवेली), रांजणगाव सांडस (ता. शिरूर), निघोजे (ता. खेड), चास (ता. आंबेगाव), नारायणगाव (ता. जुन्नर) आदी मोठ्या गावांची निवडणूकही होत आहे. वाघोली हे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर कटके आणि चास हे सदस्या तुलसी भोर यांचे गाव आहे. आशा बुचके यांचे गाव असलेले बुचकेवाडी आणि त्यांच्या जिल्हा परिषद मतदारसंघातील पंचायत समिती गण असलेल्या नारायणगाव या ग्रामपंचायतींचीही निवडणूक होत आहे.

पुढील वर्षी जानेवारी व फेब्रुवारीत मुदत संपणाऱ्या आणि जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच हे पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडून दिले जाणार असल्याने पूर्वीप्रमाणे बहुमताच्या जोरावर आपापली ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्याचे नेत्यांचे दिवस संपले आहेत. मोठ्या गावांमधून थेट जनतेतून सरपंच निवडून आणण्याचे मोठे आव्हान या नेत्यांसमोर असणार आहे.

निवडणूक होणाऱ्या गावांची संख्या
जुन्नर- २२, आंबेगाव- ९, खेड- २, शिरूर आणि दौंड प्रत्येकी- १, मावळ- ८, मुळशी- १५, हवेली- ९, वेल्हे- ४, भोर- १०, पुरंदर-२ आणि बारामती- १६.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT