Marshall Lewis 
पुणे

Pune News: ससून रुग्णालयातून पळालेल्या आरोपी मार्शल लुईसला अटक; शरद मोहोळच्या पत्नीला केली होती शिवीगाळ

ससून रुग्णालयातून पसार झालेल्या आरोपी मार्शल लुईस लीलाकर याला पोलिसांनी पहाटे पावणे दोनच्या सुमारास अटक केली आहे

कार्तिक पुजारी

पुणे- ससून रुग्णालयातून पसार झालेल्या आरोपी मार्शल लुईस लीलाकर याला पोलिसांनी पहाटे पावणे दोनच्या सुमारास अटक केली आहे. लीलाकर ११ फेब्रुवारी रोजी सकाळी सायबर पोलिसांच्या ताब्यातून ससून रुग्णालयातून पसार झाला होता. कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना सोशल मीडियावर रीलद्वारे अश्लील भाषेत शिवीगाळ दिल्याची घटना घडली होती.याबाबत पोलिसांनी आरोपी मार्शल लीलाकरला अटक केली.

लीलाकरने त्याला सकाळी छातीत दुखत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात घेऊन आले होते. त्यावेळी त्यांची नजर चुकवून लीलाकर पसार झाला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी सायबर आणि गुन्हे शाखेचे पोलिस पथक नेरळ आणि कर्जत येथे पाठवण्यात आले होते.

दरम्यान, तो येरवडा येथील मावशीच्या घरी आल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. सायबर पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली. आरोपी लीलाकरला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीने शरद मोहोळ याच्या पत्नीला

काही दिवसांपूर्वी अमली पदार्थ तस्कर प्रकरणातील ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाला होता. त्यानंतर लुईस मार्शल हाही पोलिसांना झुंगारा देऊन पळून गेल्याने खळबळ उडाली होती. यातून पोलिसांचा हलगर्जीपणा दिसत होता. लुईस मार्शल याला शोधण्यासाठी पोलिसांनी आठ पथके तयार केली होती. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

Monsoon : मॉन्सून २६ मे पर्यंत केरळात दाखल होण्याचे संकेत

ITI Admission : ‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी २१ मे पासून अर्ज प्रक्रिया होणार सुरू; राज्यात दीड लाखांहून अधिक जागा

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

SCROLL FOR NEXT