maharashtra politics crisis Sanjay Raut Arrest Uddhav Thackeray meet rauts family esakal
पुणे

Pune News: मुंबईनंतर ठाकरेंची शिवसेना पुण्यात रणशिंग फुंकणार; मुलूखमैदानी तोफ धडाडणार

सकाळ डिजिटल टीम

पुणे - मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारीच मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या महामोर्चात शिवसेनाच आघाडीवर होती. अर्थात उद्धव ठाकरे यांची शिवसेना सर्वात पुढे होती. तसेच उद्धव ठाकरे यांनी मुंबईत याआधीच सभा घेतली आहे. त्यातच आता उद्धव ठाकरेंची शिवसेना पुण्यात रणशिंग फुंकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. (Sanjay Raut news in Marathi)

पुढील आठवड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीर मेळावा पुण्यात होणार आहे. या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांची तोफ पुण्यात धडाडणार आहे. मेळाव्यात संजय राऊत शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांना करणार मार्गदर्शन आहेत. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत मार्गदर्शन करणार आहेत.

शिवसैनिकांमध्ये एक उत्साह निर्माण करण्यासाठी संजय राऊत मैदानात उतरले असून पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे जाहीर मेळावा होणार आहे. पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मेळाव्याच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. याच मेळाव्यात संजय राऊत यांच्या उपस्थितीत अनेक पक्षप्रवेश होणार होणार आहे.

पत्राचाळ घोटाळ्यात जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच संजय राऊत पुण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांकडून संजय राऊत यांच जंगी स्वागत केलं जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: नायरा एनर्जीच्या दरवाढीनंतर सरकारी कंपन्यांचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात 1 लिटरचा भाव किती?

शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचं धक्कादायक कृत्य! लग्नाच्या भूलथापा देत तरुणीचा ३ वर्ष लैंगिक छळ; तक्रार मिळताच आरोपीला अटक

Pune Teachers Constituency Election : भाजपला मोठा धक्का! पुणे शिक्षक मतदारसंघात डॉ. रोंगे यांचे बंड; विठ्ठलाचं दर्शन घेत अपक्ष म्हणून अर्ज भरण्यासाठी रवाना

Supriya Sule: ‘आधी जनतेला मदत करा, त्यानंतर निवडणुका घ्या’; दुष्काळावरून खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

शेतकऱ्यांनो सावधान! PM Kisanचा 24वा हप्ता येण्याआधी ‘ही’ एक गोष्ट तपासा, नाहीतर लाभापासून मुकाल

SCROLL FOR NEXT