pune sakal
पुणे

Pune news : कात्रज, आंबेगावमध्ये अजित पवारांचे जंगी स्वागत

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) वतीने राजीव गांधी प्राणी संग्रहालयाजवळ

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भला मोठा पुष्पहार आणि जेसीबीने फुलांची उधळण करत मोठ्या जयघोषात कात्रज-आंबेगाव परिसरात जंगी स्वागत करण्यात आले. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी)

वतीने राजीव गांधी प्राणी संग्रहालयाजवळ ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करुन विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा व पुष्पहार देऊन संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांच्याकडून सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक दिलीप थोपटे अरुण चांभारे, कालिदास गोपालघरे, स्वप्निल ढमढेरे, निखिल तांबे सो, चंद्रकांत भिंगारे यांच्यासह संघाचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

कात्रज चौकात जंगी स्वागत

माजी नगरसेवक प्रकाश कदम, हाजी गफूर पठाण, प्रतिक कदम यांच्या वतीने कात्रज चौक तर आंबेगाव येथे दत्तनगर चौकाजवळ माजी नगरसेवक युवराज बेलदरे यांनी ढोल ताशा पथक, फटाक्यांची आतषबाजी व जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करत पवार यांचे स्वागत केले.

यावेळी अजित पवार यांच्या स्वागताला कात्रज परिसरातील युवक-युवती नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT