pune news  sakal
पुणे

Pune News : आंबेगावच्या गुरुजनांचा देश आणि राज्य पातळीवर सन्मान

मृणाल गांजाळे-शिंदे यांना नवी दिल्लीत राष्ट्र्रीय व संतोष थोरात यांना मुंबईत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार.

डी.के वळसे पाटील

मंचर - शिक्षण क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केल्या बद्दल आंबेगाव तालुक्यातील आदर्श शिक्षिका मृणाल गांजाळे-शिंदे व आदर्श शिक्षक संतोष रामचंद्र थोरात या दोन गुरुजनांचा अनुक्रमे नवी दिल्ली येथे राष्ट्र्रीय व मुंबई येथे राज्यस्तरीय पातळीवरील आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

पिंपळगाव-खडकी (ता.आंबेगाव) येथील पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गांजाळे-शिंदे यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या मोलाचे योगदानाबद्दल त्यांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार जाहीर झाला होता.

नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ५० हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व पदक असे पुरस्काराचे स्वरूप होते. गांजाळे यांच्या समावेत पती मयूर शिंदे, सासू शोभा शिंदे व कन्या अविना शिंदे उपस्थित होत्या.

श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात आदिवासी दुर्गम भागात निगडाळे (ता.आंबेगाव) येथे पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक संतोष थोरात यांना सन २०२२-२३ चा थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक पुरस्कार जाहीर झाला होता.

थोरात यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे हस्ते व शिक्षक आमदार विक्रम काळे , शिक्षण आयुक्त सुरज मांढरे , शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओल , शिक्षक आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थित पुरस्कार देण्यात आला.

एक लाख रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी वडील रामचंद्र थोरात, पत्नी कमल संतोष थोरात, बहिण उज्वला राक्षे, वैशाली भोर, अश्विनी तांबडे, रोहिणी अशोक पडवळ, मुख्याध्यापिका मनीषा बाळासाहेब कानडे , लहू घोडेकर , संतोष कानडे , चांगदेव पडवळ , विकास कानडे, संतोष भोर आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT