mhada sakal
पुणे

Pune News : मेट्रोप्रमाणे ‘म्हाडा’ला स्वायत्तता द्या; सहकारी गृहनिर्माण संस्था परिषदेच्या चर्चासत्रातील सूर

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी दुपारच्या सत्रात `म्हाडा’द्वारा निर्मित इमारतींचे पुनर्विकसन या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्य सरकारने मेट्रोच्या धर्तीवर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणास (म्हाडा) स्वायतत्ता द्यावी, असा सूर पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाच्या वतीने शुक्रवारी (ता.२७) येथे आयोजित करण्यात आलेल्या एका चर्चासत्रात उमटला.पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघाच्या वतीने संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्या, प्रश्‍न व त्यांचे निराकरण करण्यासाठी नागरिकांना खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोसायट्यांसाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या तीन दिवसीय प्रदर्शन व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी दुपारच्या सत्रात `म्हाडा’द्वारा निर्मित इमारतींचे पुनर्विकसन या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात हा सूर उमटला. यामध्ये पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, स्थायी समितीचे माजी सभापती ॲड. नीलेश निकम, ‘म्हाडा’चे वरिष्ठ अधिकारी अशोक पाटील, वास्तू रचनाकार अक्षय राऊत, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, समन्वयक सुनील जोशी आदी सहभागी झाले होते.

या प्रदर्शनात केंद्र सरकारच्या या उपक्रमाबाबत नागरिकांना माहिती दिली जात आहे. स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा मंच येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यावेळी डॉ. धेंडे म्हणाले,‘‘म्हाडाला स्वायत्तता दिल्याशिवाय ‘म्हाडा’च्या गाळे धारकांच्या समस्या सुटणार नाहीत. शिवाय या समस्या सोडविण्यासाठी पुणे जिल्हा सहकारी गृह निर्माण महासंघाने पुढाकार घेऊन, याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे ठेवावा.’’ नियमावली, कायदे हे काळानुरूप बदलाशी सुसंगत असे राहिले पाहिजेत. त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असल्याचे ॲड. नीलेश निकम यांनी सांगितले.

यावेळी माजी महापालिका आयुक्त महेश झगडे यांचेही भाषण झाले. त्यांनी प्रत्येक शहरात ‘वॉक टू वर्क’ ही संकल्पना जोपासायला हवी,असे सांगितले. या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन आज सकाळी खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी महापालिका आयुक्त महेश झगडे, सेवानिवृत्त नगर रचनाकार रामचंद्र गोहाड, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया,अभय छाजेड, श्यामला देसाई, लोकायुक्त दिलीप शिंदे, प्रांजली देशपांडे, मलय देशमुख आदी उपस्थित होते.महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी स्वागत केले. समन्वयक सुनील जोशी यांनी प्रास्ताविक केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन पुढारीचे संपादक सुनील माळी यांनी केले. दुपारच्या चर्चासत्राचे सूत्रसंचालन महाराष्ट्र टाईम्सचे मुख्य बातमीदार सुनीत भावे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT