Pune News:  sakal
पुणे

Pune News: तीव्र उन्हाळ्यामुळे पक्षांचे अन्न पाण्यासाठी स्थलांतर

अन्नपाण्याच्या शोधात येणाऱ्या पक्षांची तेथे वर्दळ वाढली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News: उन्हाळ्याच्या तिव्रतेमुळे धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. कुकडी प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सुरू नसल्यामुळे नदिच्या पात्रातील पाण्याचा प्रवाह बंद झाला आहे.

सध्या कुकडी नदीच्या पश्चिम भागात ठिकठिकाणच्या बंधाऱ्यांमध्ये,मोठया डबक्यांमध्ये काही प्रमाणात पाणीसाठा आहे. अनेक ठिकाणी नदिकोरडी पडल्याचे पहावयास मिळते.कुकडीच्या पाण्यावर मानवा बरोबरच पर्यावरणातील अनेक सजीव प्राण्यांचे जीवन अवलंबून आहे.

अनेक जलचर प्राण्यांचे जीवन नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे अनेक पक्षी अन्न पाण्याच्या शोधातस्थलांतर करत असल्याचे पहावयास मिळते.येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही मुबलक पाणीसाठा आहे.अन्नपाण्याच्या शोधात येणाऱ्या पक्षांची तेथे वर्दळ वाढली आहे.

सकाळच्या वेळी लाखोंच्या संख्येने हे पक्षी पश्चिमेकडून पूर्वेकडील जलाशयाकडे जातात आणि सायंकाळी तितक्याच मोठ्या संख्येने पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात.हा सर्व प्रवास हे पक्षी नदिपात्रावरील हवाई हद्दीतून करतात.या मार्गावर सायंकाळ्या वेळी लांबच लांब पक्षांच्या रांगा पहावयास मिळतात.पाणकोंबडीच्या आकारचे काळ्या रंगाचे हे पक्षी शिस्तीत एका रांगेत उडतानाचे दृष्य अतिशय नयनरम्य असते.सकाळी नदि पात्रावरील हवाई मार्गाने जलाशयाकडे जाणे सायंकाळी त्याच मार्गाने घरी जाणे हा या पक्षांचा कित्येक दिवसांपासूनचा नित्यक्रम बनला आहे.

त्यांचे हे विलोभनिय दृष्य अनेक पक्षीप्रेमी आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सायंकाळी त्यांच्या परतीच्या मार्गावर डोळे लावून बसतात. निसर्गाचे वरदान लाभलेले सैन्यातील शिस्तीप्रमाणे वावरणारे पक्षी नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय बनले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif vs Shivaji Patil : 'शिवाजीराव मुक्त गोकुळ त्यांना करायचे का?' महायुतीच्या गोकुळमधील पॅनेलवर आमदार शिवाजी पाटलांनी केले वक्तव्य

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

Pune Crime: 'माझा गुन्हा का दाखल केला नाही?' संतापलेल्या महिलेचा पोलिस चौकीत धिंगाणा, वैद्यकीय अहवालात मोठा खुलासा

Mumbai : पावसाने रस्ते निसरडे झाले, अपघातामुळे वाहनांच्या रांगा; तर ओव्हर हेड वायर तुटून मध्य रेल्वेचाही खोळंबा

Accident News : मध्यरात्री भीषण अपघात ! कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT