पुणे

Pune News: उजनी पात्रात बोट उलटली, शोधकार्यासाठी एनडीआरएफचे पथक दाखल, सहा जण बेपत्ता

सोलापूर जिल्ह्यातील कुगाव ते कळाशी दरम्यान प्रवाशी वाहतूक करणारी बोट

संतोष आटोळे

Solapur: उजनी धरण पात्रात मंगळवार (ता.21) रोजी सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यात सोलापूर जिल्ह्यातील कुगाव येथून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळाशी कडे प्रवासी वाहतूक करणारी बोट (लांस )उलटली होती.यामध्ये एकुण 7 प्रवासी होते.

त्यापैकी 1 जण पोहत नदीच्या किनाऱ्या आला होता मात्र इतर सहा जण बेपत्ता होते रात्री अंधार असल्याने शोध कार्य थांबले होते दरम्यान आज बुधवार (ता.22) रोजी सकाळीच एन डी आर एफ चे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधकार्याची मोहीम हाती घेतली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्यातील कुगाव येथून इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे जाण्या-येण्यासाठी उजनी पात्रात लॉन्च द्वारे वाहतूक केली जाते. मंगळवार रोजी सायंकाळी कुगाव येथून गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकूळ जाधव (वय २५), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय ३, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), गौरव डोंगरे (वय 16 वर्षे) सोलापूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले राहुल डोंगरे या प्रवाशांना घेऊन बोट चालक कुगाव येथील अनुराग अवघडे (वय ३५) कळाशीच्या दिशेने निघाला.बोट काही अंतरावर पुढे गेले असता अचानक जोरदार सुटलेल्या वादळ आणि वळवाच्या पावसाने नदीपात्रात लाटा निर्माण झाल्याने बोट पलटी झाली.

यावेळी या बोटीत प्रवास करत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे बोट पलटी झालेल्या ठिकाणीहून पोहत कळाशी (ता.इंदापूर) च्या किनाऱ्यालगत आले तर इतर प्रवासी बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, इंदापूर पोलीस, महसूल प्रशासनातील अधिकारी कर्मचारी, घटनास्थळी दाखल झाली बोट कुठे पलटी झाली याबाबत तपास कार्य सुरू होते.

बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड, इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी घटनास्थळी उपस्थित राहत शोध कार्यास मार्गदर्शन केले. मात्र अंधार पडल्याने तपास कार्यात अडचण येत होत्या. त्यामुळे रात्री काहीच हाती लागले नाही.

त्यानंतर आज बुधवार रोजी सकाळी एनडीआरएफ चे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी शोधकार्य सुरू केले आहे.

आमदार भरणे रात्रीच घटनास्थळी..

दरम्यान घटना घडल्याची माहिती मिळताच माजी राज्यमंत्री आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देत वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधत तात्काळ शोध कार्यात सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना केल्या. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्यासह स्थानिक आजी-माजी पदाधिकारी ही उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटलांनी ही माहिती घेत दिल्या मदतीच्या सूचना..

या घटनेची माहिती समजतात राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचेसह इतर विभागाच्या शासकीय यंत्रणेची संपर्क साधून मदत कार्य करणे संदर्भात माहिती घेऊन सूचना दिल्या तसेच या संदर्भात शासकीय यंत्रणेची संपर्क ठेवून आहेत.

1) 2017 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील काही डॉक्टर उजनी धरण जलाशयामध्ये फिरण्यासाठी आले होते त्यावेळी बोट पलटी होऊन काही डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

2) 2022 मध्ये मुंबई येथील चार तरुण उजनीकाठच्या गावातील आपल्या नातेवाईकांकडे आल्यानंतर उजनी धरण जलाशयात फिरण्यासाठी गेले असता त्यापैकी एका तरुण पाण्यात पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या एक स्थानिक मच्छिमाराला त्याने घट्ट पकडून धरल्याने यामध्ये दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT