Pune news boyfriend Took bite girlfriend cheek  sakal
पुणे

प्रेयसीच्या गालाचा चावा घेतला... पुण्यात प्रियकरावर गुन्हा दाखल!

प्रेमप्रकरणात ब्रेकअपनंतर प्रियकराने प्रेयसीला शिवीगाळ करुन मारहाण प्रेमवीरावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

उंड्री : प्रेमप्रकरणात ब्रेकअपनंतर प्रियकराने प्रेयसीला शिवीगाळ करुन मारहाण केली. एवढेच नाहीतर त्याने प्रेयसीच्या गालाचा चावा घेणाऱ्या प्रेमवीरावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार उंड्री, तसेच दोराबजी मॉल परिसरात 31 मार्च रोजी घडला आहे. दानीश नायर (वय-22 रा. ससाणेनगर, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकर तरुणाचे नाव आहे. याबाबत 21 वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. त्यांच्यामध्ये सध्या ब्रेकअप झाले असून, त्यांच्यात वाद सुरु आहेत. 31 मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पुन्हा त्यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपीने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच तिला पाहून घेण्याची धमकी देऊन मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले. यावेळी तरुणाने फिर्यादी तरुणीच्या गालाचा चावा घेऊन विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT