supriya sule  sakal
पुणे

Pune News : कुटुंब म्हणून एकत्र दिवाळी साजरी करणार- सुप्रिया सुळे

विद्या प्रतिष्ठानच्या भिगवण शाळेच्या उदघाटन प्रसंगी ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार व तुम्ही एकत्र असणार का?

मिलिंद संगई, बारामती..

बारामती - राजकीय भूमिका वेगळी व कौटुंबिक नाते वेगळे, त्या मुळे दिवाळीत बारामतीतील गोविंदबागेत पवार कुटुंबिय एकत्रच दिवाळीचा सण साजरा करतील, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. बारामतीतील माळावरच्या देवीच्या दर्शनाला सुप्रिया सुळे आल्या होत्या, तेव्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी यंदाची दिवाळी पवार कुटुंबिय एकत्रच साजरी करणार असल्याचे नमूद केले.

अजित पवार यांनी भाजपसोबत जात सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर यंदा दिवाळीत सर्व पवार कुटुंबिय एकाच ठिकाणी येत राज्यातील कार्यकर्ते व नागरिकांच्या शुभेच्छा स्विकारणार या बाबत बारामतीकरांमध्ये उत्सुकता होती. या बाबत सुळे यांना विचारले असता त्यांनी एकत्रच दिवाळी साजरी करणार असल्याचे सांगितले.

विद्या प्रतिष्ठानच्या भिगवण शाळेच्या उदघाटन प्रसंगी ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार व तुम्ही एकत्र असणार का, या प्रश्नावर बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीत फूट नसल्याचेच नमूद केले. काही सहकारी वेगळ्या विचाराच्या पक्षासोबत गेले, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, विद्या प्रतिष्ठान व अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्था सामाजिक काम करतात. दोन्ही संस्थांच्या कार्य़क्रमाला पवार कुटुंबिय कुटुंब म्हणून नेहमीच एकत्र आले आहे. त्याला राजकीय रंग देणे योग्य नाही.

गोविंदबाग राज्यातील मायबाप जनतेचे हक्काचे घर आहे. ते कायमच खुले आहे, तेथे कोणीही कधीही येऊ शकते, नेते म्हणून नाही तर कौटुंबिक नाते म्हणून आम्ही दिवाळीत एकत्र येणार आहोत. आमच्याच राजकीय मतभेद जरूर आहेत. परंतु राजकीय मतभेद व कौटुंबिक जबाबदाऱया वेगवेगळ्या असतात. राजकारणात कोणीही कुटुंबातील नाती, जबाबदारी डावलू नये, या मताची मी आहे. या दोन गोष्टीत गल्लत करू नये. जेथे राजकीय लढाईचा विषय येईल तेथे ती पूर्ण ताकदीने लढू, परंतु कुटुंबाचा विषय असेल तर राजकारण बाजूला ठेवू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

Coal Rate: आता वीज बिल वाढणार नाही! कोल इंडियाचा मोठा निर्णय; उद्योग आणि ग्राहकांना मोठा दिलासा

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Breaking News Live Update: संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील एलओपी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

SCROLL FOR NEXT