pune sakal
पुणे

Pune News : लिफ्टमधे अडकलेल्या लहान मुलाची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका

लिफ्टच्या दरवाजा खुलत नसल्याने मुलगा भेदरलेल्या अवस्थेत होता.

मोहिनी मोहिते

कँटोन्मेंट - लिफ्टमधे अडकलेल्या लहान मुलाची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका करण्यात आली. भवानी पेठ, गुरूनानक नगर, अर्बन सॉलिटियर येथे इमारतीत पहिल्या मजल्यावर लिफ्ट अचानक बंद पडल्याने एक सात वर्षाचा मुलगा अडकला होता.

यावेळी कुटुंबीयांनी २३ सप्टेंबर रोजी राञी ०९•०५ वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात संपर्क करताच 10 मिनिटात जवान घटनास्थळी दाखल झाले. लिफ्टच्या दरवाजा खुलत नसल्याने मुलगा भेदरलेल्या अवस्थेत होता. सतत त्याच्या आईला हाक देत होता.

यावेळी आईचा जीव ही कासावीस झाला होता. यावेळी जवानांनी मुलाला आवाज देत त्याच्याशी संवाद सुरू ठेवत लिफ्ट रुममधे जाऊन तांञिकरित्या कार्य पार पाडत लिफ्ट पहिल्या मजल्यावर समांतर घेण्यात आली. तसेच दलाकडील स्प्रेडरचा वापर करुन लिफ्टचा दरवाजा उघडत लहान मुलाची सुमारे वीस मिनिटांनी सुखरुप सुटका केली.

सुटका होताच तेथील रहिवाशांनी जवानांचे आभार मानले. या कामगिरीत अग्निशमन नियंत्रण कक्ष अधिकारी पंकज जगताप, वाहनचालक अतुल मोहिते, प्रशांत मखरे, तांडेल मंगेश मिळवणे व फायरमन चंद्रकांत गावडे, सुधीर नवले, ओंकार बोंबले, अमर दिघे, केतन नरके यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : आत्मनिर्भर भारताची गती वाढणार, संरक्षण क्षेत्रातही महाशक्ती बनण्याचा मोदींचा निर्धार

El Nino Alert : पुढील वर्षाच्या मॉन्सूनबाबत हवामान विभागाचे मोठे संकेत! प्रशांत महासागराचे तापमान होणार कमी; 'एल निनो' ओसरणार? 'नोआ'च्या अहवालाने वाढवली चिंता

HOROSCOPE: १५ ऑगस्टपासून ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरू; आर्थिक स्थिती सुधारणार अन् करिअरमध्ये मिळणार मोठं यश, तुमची रास कोणती?

Census 2026: जनगणनेसाठी ४० प्रश्‍नांची सूची; स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातिगणनाही होणार

ASIA CUP 2026: जेमिमा रॉड्रिग्स आशिया कप आणि आशियाई खेळांमधून बाहेर; BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ धडाकेबाज फलंदाजाला मिळाली संधी

SCROLL FOR NEXT