पुणे

धुलिकण मुक्‍तीचे चिनी मॉडेल

सकाळवृत्तसेवा

पुणे - आठवड्यातून दोन ते तीन वेळा पाण्याने रस्ते धुणे आणि बांधकाम प्रकल्पांची धूळ रस्त्यावर येणार नाही याची प्रकर्षाने काळजी घेणे, या उपाययोजना परदेशांमध्ये केल्या जात असल्याने तेथील हवेतील सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण धोकादायक पातळीपेक्षा कमी आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

हवेत तरंगणारे सूक्ष्म धूलिकण आरोग्यास घातक असतात. त्यातून सार्वजनिक आरोग्य धोक्‍यात येते. जगभरातील शहरे धूलिकण प्रदूषणांची केंद्रे होत आहेत. यापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. त्यातून हवेतील तरंगत्या धूलिकणांचे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे, अशी माहितीही तज्ज्ञांनी दिली.

युरोपमध्ये रस्ते नियमित स्वच्छ केले जातात. तेथील रस्त्यांची गुणवत्ता तर चांगली आहेच, शिवाय रस्त्याच्या कडेला पदपथ, सायकल ट्रॅक अशी व्यवस्था केलेली असते. त्याद्वारे धूळ निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाते. वाहतूक व्यवस्थापन चांगले असल्याने वाहतूक कोंडी होत नाही. त्यातून उत्सर्जित होणाऱ्या धुरातून सूक्ष्म धूलिकण हवेत पसरत नाहीत, अशी व्यवस्था असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.

रस्ते हेच शहरातील धुळीचे मुख्य उगमस्थान असते. रस्ते स्वच्छ ठेवणे हा धूळ नियंत्रणाचा सर्वांत सोपा मार्ग आहे. त्यासाठी चीनमध्ये रस्ते पाण्याने चक्क धुतले जातात. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेली धूळ वाहन गेल्यानंतर उडत नाही. पर्यायाने हवेतील धूलिकणांचे प्रमाण धोक्‍याच्यावर जात नाही.

- डॉ. संदीप साळवी,  संचालक, चेस्ट रिसर्च फाउंडेशन (सीआरएफ) 

धूलिकण नियंत्रणाचे परदेशांतील प्रयोग
 रस्ते पाण्याने धुतले जाणे
 रस्त्याच्या कडेला पदपथ 
 वाहनांच्या टायरची नियमित देखभाल 
 मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय
 पायी चालण्यासाठी आणि सायकलसाठी स्वतंत्र ट्रॅक

चीनमध्ये आठवड्यातून दोन ते तीन वेळा टॅंकरच्या पाण्यातून रस्ते स्वच्छ धुतले जातात. त्यातून मोठ्या प्रमाणात हवेत उडणारी धूळ नियंत्रणात येते. बांधकाम प्रकल्पातून उडणारी धूळ नियंत्रणासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जाते. त्यात बांधकाम प्रकल्पाच्या भोवती पूर्ण पत्रा उभारला जातो. त्यातून रस्त्यावर येणारी धूळ नियंत्रित होते.
- मनोज मोडक,  पर्यावरण विषयाचे अभ्यासक

सायकलचाच प्रभावी वापर
वाहनांचा किमान वापर करण्यावर परदेशातील नागरिकांचा भर असतो, असे स्पष्ट करून डॉ. शैलजा काळे म्हणाल्या, ‘‘जवळच्या अंतरावर जाण्यासाठी चीनमधील नागरिक चालत जातात. दूरच्या अंतरावर जाण्यासाठी किंवा नियमित कार्यालयात जाण्यासाठी सायकलचाच प्रभावी वापर केला जातो. त्यामुळे रस्त्यावरील धुळीचे प्रमाण आपोआप कमी होते. खूप दूरच्या अंतरावर जाण्यासाठीच वाहनाचा वापर केला जातो.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT