dhol sakal
पुणे

Pune News : 'ढोल'च्या आवाजाने नागरिक त्रस्त

रहिवासी झोनमधील ढोल पथकांच्या स्थलांतराची मागणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सलग दोन ते तीन महिने चार-पाच तास ढोलचा आवाज कानावर पडत असल्याने मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत आहे. त्यामुळे नागरिकांना कानदुखी, डोकेदुखी अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रहिवासी झोनमध्ये सराव करणाऱ्या ढोल पथकांनी शहराच्या बाहेर किंवा आॕनलाईन पध्दतीने सराव करावा, अशी मागणी कर्वेनगर भागातील सोसायट्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

राजाराम पूल ते शाहू कॉलनी परिसरात नदीकाठी पाच-सहा ढोल पथक गणेशोत्सवाच्या आगोदर दोन ते तीन महिने दररोज चार ते पाच तास सराव करतात. जवळपास दोनशेपेक्षा अधिक वादक एकाच वेळी वादन करत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होते.

त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास न होणे, लहान मुले रडणे, जेष्ठ नागरिकांचे कान दुखणे अशा समस्यांमध्ये वाढ होत आहे. पोलिसंनी याकडे लक्ष देऊन रहिवासी झोनमधील ढोल पथके बाहेर स्थलांतरित करण्याची मागणी कर्वेनगर परिसरातील पिनाक आनंद, आशा रेसिडेन्सी, चिंतामणी रेसिडेन्सी, बराटे एम्पायर आदी सोसायट्यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

प्रतिक्रिया

"पथकातील वादणामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होतो हे खरं आहे. आम्ही इतरांना त्रास देण्यासाठी वाजवत नाही हे देखील तेवढेच खरे आहे. परंतु, नागरिकांना त्रास होत असेल तर आमच्याकडून खबरदारी घेतली जाईल. पुढील वर्षापासून स्मार्ट पध्दतीने म्हणजे, आॕनलाईन सराव घेण्याचं नियोजन करत आहोत. - अॕड. मंदार गोसावी, अध्यक्ष, गंधार वाद्य पथक

"जेष्ठ नागरिक, लहान मुले यांना मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. गणेशोत्सवापूर्वी दोन ते तीन महिने सराव चालतो, या दरम्यान नागरिकांना घरी बसणे देखील कठीण होते. आपली संस्कृती जपली पाहिजे परंतु इतरांना त्रास होता कामा नये याचे देखील भान ठेवावे. शहरातील ढोल पथके, गणपती मंडळ, पोलिस प्रशासन आणि राजकीय मंडळींनी यावरती एकत्रित पर्याय काढायला हवा. - हेमंत नाडकर्णी, रहिवासी कर्वेनगर

"नियमित कानावर ढोलचा तीव्र आवाज येत असेल तर माणसाची चिडचिड वाढू शकते, कानाची नस खराब होणे किंवा बहिरेपणा येणे अशा समस्या होऊ शकतात. असे झाले तर सुरवातीच्या ४८ तासांत उपचार घेणे आवश्यक असते. - डॉ.अजिक्य केळकर, कान नाक घसा तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT