पुणे

अधिकाऱ्यांना दमबाजी करणाऱ्यांना आवरा 

अनिल सावळे

प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी- कर्मचाऱ्यांना कामकाज करताना शिवीगाळ, मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार घडत आहेत. पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना पत्राद्वारे एका व्यक्‍तीने जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. एकदा नव्हे, तर तीनवेळेस धमकी दिली. मात्र, ती व्यक्‍ती कोण, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यानंतर महापालिकेचे उपायुक्‍त माधव जगताप यांनाही एकाने फोनवरून धमकी दिली. याबाबत पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून "कर्तव्य' पार पाडले. मात्र, पोलिसांनी अशा गुन्ह्यांचा तपास गांभीर्याने केल्यास पुढे असे प्रकार घडणार नाहीत. 

पीएमपीच्या संचालक मंडळाने ऑगस्ट महिन्यात सर्व प्रकारच्या पासच्या दरांत वाढ केली. त्या वेळी ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पासच्या दरातही वाढ झाली. त्यानंतर काही दिवसांतच भुजंगराव मोहिते नावाच्या एका व्यक्‍तीने तुकाराम मुंढे आणि त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याच्या धमकीचे पत्र पाठविले. त्यामुळे शहरात खळबळ उडाली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुंढे यांना चौथ्यांदा धमकी दिली. या पत्रात पीएमपीच्या अन्य अधिकाऱ्यांनाही धमकी देण्यात आली. परंतु, धमकी देणारी "ती' व्यक्‍ती कोण, हे पोलिसांना शोधता आले नाही. त्यामुळे या गुन्ह्याचा तपासही सध्या "अदखलपात्र' अवस्थेत आहे. मुंढे हे प्रशासनात शिस्तबद्ध अधिकारी समजले जातात. त्यांनी पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकाचा पदभार घेतल्यानंतर काही कटू निर्णय घेतले. त्यांच्या या निर्णयांचा त्रास नेमका कोणाला झाला, हेही तपासणे गरजेचे आहे. एखाद्याकडून ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पासचे कारण पुढे करून मानसिक त्रास देण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. 

स्वारगेट पोलिसांनी हा गुन्हा अदखलपात्र म्हणून नोंदविला, तरी न्यायालयाची परवानगी घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. धमकीचे पत्र पाठविणाऱ्या "त्या' व्यक्‍तीचा धनकवडी येथील पत्ता आणि नाव बनावट असल्याचे समोर आले आहे. या पत्रावर धनकवडीचा पत्ता असल्यामुळे पोलिसांनी त्या परिसरातील 20 संशयितांची चौकशी केली. धमकीचे पत्र आणि संशयितांच्या हस्ताक्षरांची तज्ज्ञांमार्फत पडताळणी केली. तसेच, ज्येष्ठ नागरिकांच्या काही संघटनांसोबतही चर्चा केली. काहीजणांचे हस्ताक्षरही तपासले. पण त्यात मिळते-जुळते हस्ताक्षर आढळून आले नाही. धमकीच्या त्या पत्रांवर कोणत्या टपाल कार्यालयाचा शिक्‍का आहे, त्यावरून माग काढण्याचाही प्रयत्न पोलिसांनी केला. त्या वेळी त्या पत्रांवर स्वारगेट, शिवाजीनगर, पर्वती आणि मार्केट यार्ड टपाल कार्यालयांचे शिक्‍के असल्याचे आढळून आले. स्वारगेट पोलिसांकडून प्रयत्न होत असले, तरी धमकी देणाऱ्या "त्या' व्यक्‍तीचा छडा लावता आलेला नाही, हेही तेवढेच खरे आहे. 

दरम्यान, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्‍त माधव जगताप यांनाही एका व्यक्‍तीने धमकी दिली. एरवी फोनवरून खंडणीची धमकी देणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल केला जातो, मात्र याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक अशा धमकीबहाद्दराविरूद्ध गुन्हे नोंदवून त्याच्यावर कडक कारवाई होणे अपेक्षित असताना पोलिसांनी केलेली टाळाटाळ आश्‍चर्यजनक ठरते. त्याचप्रमाणे शहरात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना वाहनचालकांकडून शिवीगाळ आणि मारहाणीचे प्रकार घडत आहेत. त्याबाबत सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला जातो. मात्र, असे प्रकार घडू नयेत, यासाठी सर्वांनीच खबरदारी घेण्याची गरज आहे.

जनता दरबार

'प्रश्‍न नागरिकांचे उत्तर अधिकाऱ्यांचे' या उपक्रमात पुणे 'महावितरण' कार्यालयासंदर्भातील आपले प्रश्‍न, अडचणी, शंका यांना 'महावितरण' चे वरिष्ठ अधिकारी 'सकाळ'च्या माध्यमातून उत्तर देणार आहेत. त्यासाठी वीजपुरवठा, वीज बिल किंवा या संदर्भातील आपले प्रश्‍न थोडक्‍यात आमच्याकडे 18 नोव्हेंबरपर्यंत पाठवावेत. प्रश्‍न थोडक्‍यात आणि नेमकेपणाने नमूद करावेत.
आपले प्रश्‍न 9921097482 या व्हॉट्‌स ऍप क्रमांकावर किंवा sakaljanatadarbar@esakal.com या ई-मेलवर पाठवा.

निवडक प्रश्‍न उत्तरासह 'सकाळ'मध्ये पुणे आवृत्तीत प्रसिद्ध होतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT