पुणे

सायकल योजनेचे भवितव्य आज ठरणार 

सकाळवृत्तसेवा

पुणे - नियोजित सायकल योजना आणि आरोग्य उपविधीबाबत चर्चा करण्यासाठी महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांची बुधवारी (ता. 13) बैठक होणार आहे. त्यात या योजनांचे भवितव्य ठरणार आहे. यामुळे महापालिकेच्या गुरुवारी (ता. 14) होणाऱ्या खास सभेत सायकल योजनेला मंजुरी मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे. 

दरम्यान, ही योजना राबविण्यात येणार असल्याचे महापालिकेतील एका पदाधिकाऱ्याने सांगितले. शहरातील नागरिकांना भाडेतत्त्वावर सायकली उपलब्ध होण्यासाठी ही सायकल योजना राबविण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यासाठी आयुक्त कुणाल कुमार यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला असून, त्याला स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार पंधरा दिवसांपूर्वी योजनेचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. तो मंजूर करण्याबाबत आयुक्त आग्रही असतानाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करत हा प्रस्ताव पुढे ढकलला होता. ही योजना मंजूर करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. त्यानंतरही सर्वसाधारण सभा तहकूब केली होती. त्यामुळे ही योजना लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले होते. "योजनेचा अभ्यास करावयचा असल्याने हा प्रस्ताव पुढे ढकलल्याचे भाजपने स्पष्ट केले होते. या योजनेसंदर्भात गुरुवारी होणाऱ्या बैठकीत पुन्हा चर्चा होणार आहे. आयुक्त कुणाल कुमार यांनी ही योजना मंजूर व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्रीही या योजनेसाठी सकारात्मक असल्याने ती मंजूर होईल, असे सूत्रांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT