Karve road  
पुणे

Pune News : कर्वे रस्त्यावरील ‘नो पार्किंग’ उठविण्याची मागणी; रस्त्यावर अनेक व्यावसायिक दुकाने

सकाळ डिजिटल टीम

पुणे : मेट्रो प्रकल्प, उड्डाण पूल यांची कामे पूर्ण झाली असल्यामुळे कर्वे रस्त्यावर गेल्या सहा वर्षांपासून सुरू झालेले नो पार्किंग रद्द करून तेथे विषम पार्किंग सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनाधिकार सेनेने एका निवेदनाद्वारे महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडे सोमवारी केली.

मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाल्यामुळे महापालिकेने २०१८ पासून खंडोजीबाबा चौकापासून कोथरूडमधील करिष्मा चौकापर्यंत सरसकट मुख्य रस्त्याच्या दुतर्फा "नो पार्किंग" चा निर्णय राबवला. दरम्यानच्या काळात मेट्रो, नळस्टॉप चौकातील उड्डाण पूल यांची कामे पूर्ण झाली. त्यानंतर हा रस्ता आता ६० फुटांपेक्षा जास्त रुंद असून वाहतुकीसाठी खुला आहे.

या संपूर्ण रस्त्यावर व्यावसायिकांची दुकाने आहेत. तसेच अनेक बॅंका, महाविद्यालये आहेत. पार्किंग नसल्यामुळे व्यावसायिकांच्या व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. या बाबत कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशननेही वाहतूक पोलिस, महापालिकेकडे नो पार्किंग उठविण्याची मागणी केली आहे.

परंतु, प्रशासनाकडून या बाबत दुर्लक्ष केले जात आहे, असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि जनाधिकार सेनेचे अध्यक्ष हेमंत संभूस यांनी निवेदनात म्हटले आहे. या बाबतच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास मनसेकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

या बाबत कोथरूड वाहतूक पोलिसांच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की, नो पार्किंग उठविण्याबाबत वाहतूक पोलिस विचार करीत आहेत. महापालिकेशी चर्चा करून लवकरच या बाबत निर्णय घेतला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT