पुणे

डेंगीचा सर्वाधिक "ताप' पुण्याला

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यात डेंगीचा सर्वाधिक "ताप' पुण्याला झाला आहे. स्वाइन फ्लूच्या पाठोपाठ आता पुण्यात डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे निदान राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने गुरुवारी केले. त्यात पुणे आणि मुंबईमध्ये सर्वाधिक डेंगीचे रुग्ण असल्याची माहिती आरोग्य खात्याच्या पुढे आली.

या पार्श्‍वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी डेंगी आणि स्वाइन फ्लूबाबतचा आढावा घेतला. अतिरिक्त संचालक डॉ. एम. एस. डिग्गीकर, साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, पुणे परिमंडलाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख आदी उपस्थित होते. त्यात सर्वाधिक डेंगीच्या रुग्णांची संख्या पुण्यात असल्याची माहिती पुढे आली असून, त्याखालोखाल मुंबईचा समावेश आहे.

पुण्यात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये पाऊस पडल्याने डासांचा फैलाव पुन्हा वाढण्याचा धोका असून, पुढील आठ दिवसांमध्ये डेंगीचे रुग्ण वाढतील, अशी शक्‍यता या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

डॉ. डिग्गीकर म्हणाले, 'डेंगीच्या प्रत्येक रुग्णाची नोंद करणे कायद्याने बंधनकारक केले आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाचे अचूक निदान आणि योग्य उपचार तातडीने मिळणे आवश्‍यक आहे. राज्याच्या ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये डेंगीच्या रुग्णांची संख्या मोठी असून, पुण्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.''

पुण्यात डेंगीच्या रुग्णांची संख्या जास्त असली तरी या रोगाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण मुंबईपेक्षा कमी आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

पुण्यात दक्षतेचा इशारा
शहरात पावसाने विश्रांती घेतल्याने सार्वजनिक ठिकाणी पाणी साचून होणाऱ्या डासांची पैदास नियंत्रित झाली होती. त्यामुळे घरातील डासोत्पत्ती नियंत्रणावर लक्ष केंद्रित केले होते; मात्र गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये शहरात दमदार पाऊस झाला. टायर, भंगार साहित्य, फुटक्‍या काचा, नारळाच्या करवंट्या येथे पाणी साचून त्यात डासांची पैदास होण्याची शक्‍यता कीटकरोगतज्ज्ञांनी वर्तविली आहे.

शहर ........... रुग्णांची संख्या ........ मृत्यू झालेले रुग्ण
पुणे ............ 1319 ................5
मुंबई ........... 1011 ............. 17
पुणे ग्रामीण .....135 ................. 6

97 हजार 780 - राज्यातील डेंगीचे संशयित रुग्ण
5 हजार 852 - डेंगीचे निश्‍चित निदान झालेले रुग्ण
32 - डेंगीने मृत्युमुखी झालेल्या रुग्णांची संख्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT