pcmc 
पुणे

दुरूस्तीची काढलेली कामे म्हणजे कामांचा दिखावा?

रमेश मोरे

जुनी सांगवी - पिंपरी चिंचवड शहरात सत्तातरानंतर पहिल्यांदाच पालिकेने प्रत्येक कामात सल्लागार नियुक्त करून सर्व सामान्य माणसांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी सुरू असुन ती थांबविण्यात यावी, याबाबत महापालिका आयुक्तांकडे माजी स्थायी अध़्यक्ष प्रशांत शितोळे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,पिंपरी चिंचवड शहराचा सन २००२ ते २०१७ पर्यंतच्या काळातील विकास पाहता पिंपरी चिंचवड महापालिका ही देशातील वेगाने विकसित झालेली महापालिका आहे. २०१७ च्या सत्तांतरानंतर गेल्या काही महिन्यांपासुन सत्ताधारी व प्रशासन कोणत्याही कामासाठी सल्लागार नेमुन सर्वसामान्य माणसांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी करत आहे? विशेष म्हणजे सन २०१७ पुर्वी सल्लागारांना तिव्र विरोध करणारे आत्ता सत्ताधारी झाल्यावर सल्लागारांना स्वागत कक्ष उभारून बसले आहेत. अनेक,रस्त्यांच्या कामाला दुरूस्तीची गरज नसताना सल्लागारांमार्फत कामे काढुन कामांचा दिखावा कशासाठी?अनेक कामांचा क्रॉस सेक्शन काँमन असताना असतानाही सल्लागारांची नेमणुक कशासाठी, यात महापालिकेचे अधिकारी निष्क्रिय झाले आहेत का? कामावर तुमचे नियंत्रण नाही का? असे अनेक प्रश्न त्यांनी या  निवेदनात विचारले आहेत.यात विविध चुकींच्या कामाचे दाखले त्यांनी निवेदनात दिले आहेत.

''हॉटेल महाराजा पिंपळे गुरव ते जुनी सांगवी बसस्थानक ते स्पायसर पुलापर्यंतच्या रस्त्याचे आयुष्यमान अजुन काही काळ टिकणारे असुनही पुन्हा पुन्हा त्याच प्रस्तावित कामाऐवेजी काही कालावधीनंतर नविन कामांची प्रक्रिया सुरू का?. रस्ते चांगले असताना विनाकारण पुन्हा खोदकाम करून त्याच प्रकारचे काम कशासाठी? आमचा विरोध हा केवळ त्याच त्या सारख्या होणा-या कामांना आहे. उलट तेच काम गरज असलेल्या ठिकाणी करण्यात यावे. रस्त्यांचे ऑडिट करून रिपोर्ट सादर झाल्यानंतरच सल्लागाराचे प्रतिज्ञापत्र घेवुन, कामाची जबाबदारी सल्लागार,अधिकारी व सक्षम समिती यांच्यावर सोपवावी. सल्लागार असलेल्या रस्त्यांबाबत २ बाय २ फुट एक मिटर रस्त्याची सद्यस्थिती  तपासुनच कामास मंजुरी द्यावी,'' असे प्रशांत शितोळे यांनी निवेदनात म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

Raigad Heavy Rain : पाऊस आला धावून, अन् रस्ते गेले वाहून; रायगड जिल्ह्यात रस्ते व महामार्गांची दूरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात

IND vs ENG 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला! ज्याच्यामुळे मागची मॅच हरली, त्याला केले संघाबाहेर; बघा कशी आहे Playing XI

Vasai Virar Local Stop : पावसापुढे रेल्वेची पुन्हा शरणागती; १२ तासांत दुसऱ्यांदा वसई-विरार लोकल ठप्प! लाखो प्रवासी अडकले

Nagpur Crime : ‘एआय’ तंत्रज्ञानाने शोधला निर्घृण मारेकरी; वृद्धेवरील अत्याचार व खुनाचा झाला उलगडा

SCROLL FOR NEXT