पुणे

‘डीएसके’ आणखी दोन दिवस खासगी रुग्णालयात 

सकाळवृत्तसेवा

पुणे - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर आणखी दोन दिवस खासगी रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. यासंदर्भात त्यांच्या वकिलांनी केलेली मागणी न्यायालयाने मान्य केली. २३ फेब्रुवारी रोजी खासगी रुग्णालय आणि ससून रुग्णालयातील वैद्यकीय मंडळाने कुलकर्णी यांची तपासणी करून ते चौकशीसाठी तंदुरुस्त आहेत का, याचा अहवाल द्यावा, असा आदेश विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी दिला आहे.

फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर पोलिस कोठडीत असताना कुलकर्णी यांची प्रकृती बिघडली. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविले गेले. या दोन दिवसांत त्यांच्यावर केलेल्या उपचारांचा आणि त्यांच्या प्रकृतीचा अहवाल मंगळवारी न्यायालयात सादर केला होता. 

‘‘कुलकर्णी यांना मंगेशकर रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथे ‘एमआरआय’ काढला गेला होता. त्या तपासणीनुसार कुलकर्णी यांच्या मेंदूत रक्ताची गाठ असल्याचे दिसून आले आहे. ससून रुग्णालयात त्यांचा एमआरआय केला नव्हता,’’ अशी माहिती त्यांचे वकील श्रीकांत शिवदे यांनी न्यायालयास  दिली.

 या गाठीमुळे कुलकर्णी यांच्या मेंदूला इजा पोचू शकते, अशी भीती शिवदे यांनी व्यक्त करीत कुलकर्णी यांच्यावर मंगेशकर रुग्णालयातच उपचार करणे आवश्‍यक आहे. ससून रुग्णालयात या आजारावर उपचार करण्याची सुविधा नसल्याचा दावाही त्यांनी केला. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी शिवदे यांच्या मागणीस विरोध केला. ‘‘कुलकर्णी यांच्याकडून चाळीस मिनिटे चालण्याचा व्यायाम करून घेण्यात आला आहे. ससूनमधील दहा तज्ज्ञ डॉक्‍टरांनी केलेल्या तपासणीत कुलकर्णी यांचा रक्तप्रवाह सुरळीतपणे सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचा रक्तदाब व शुगर नियंत्रित ठेवण्याची गरज व्यक्त केली आहे. कुलकर्णी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्याएवढी परिस्थिती गंभीर नाही. त्यामुळे त्यांना ‘जनरल वॉर्ड’मध्ये ठेवले आहे. ससून रुग्णालयात त्यांच्यावर चांगले उपचार होऊ शकतात. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात पाठवू नये,’’ असा युक्तिवाद चव्हाण यांनी केला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT