पुणे

Pune News : गूळ-भुसार बाजारात अनधिकृत बांधकामांना जोर : पुणे बाजार समितीतील प्रकार

प्रवीण डोके

Pune News : गूळ-भुसार बाजारात अनधिकृत बांधकामांनी जोर धरला आहे. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रशासनाने बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत. ती बांधकामे न पाडता बाजारात नव्याने बांधकामे सुरू झाली आहेत. याला संचालक मंडळाचे पाठबळ असल्याची चर्चा बाजारात आहे.

बाजार समितीकडून फरशी, रंगरांगोटी अशा कारणासाठी परवानगीच्या नावाखाली अनधिकृतपणे अवैध साईडपट्टी वाढविणे, मजला चढविणे, पोटमाळे वाढविणे, शेड उभारणे आदी प्रकारची अनधिकृत कामे केली गेली आहेत. याबाबत ‘सकाळ’ने बातमीच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधू घेतले. त्यांनतर बाजार समिती प्रशासनाला जाग आली. संबंधित भुखंडधारकांना बांधकामे पाडण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. मात्र, समितीच्या नोटीसीला केराची टोपली दाखवत अनेकांनी साईडपट्टी, रूमचे बांधकाम, शेडची कामे उरकुन घेतली आहेत. यावरून बाजार समितीच्या अधिकार्‍यांचा धाक नसल्याचे स्पष्ट होत आहे.

मार्केट यार्डातील गूळ-भुसार विभागात भुखंड वाटप केल्यानंतर त्यावर बांधकामासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असते. मात्र, भुसार विभागात महापालिकेने दिलेल्या प्रत्यक्ष परवानगीशिवाय अतिरिक्त बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. तर, काही भुखंडधारकांनी मागील काही वर्षांपासून मार्केट यार्डात अनेक अनधिकृत बांधकामे केली आहेत. आता संचालक मंडळाच्या काळातदेखील पुन्हा बांधकामांनी जोर धरला आहे.

अनधिकृत बांधकामासाठी काही संचालकचांचा दबाव ?

बाजार समितीचे सचिव बांधकाम पाडण्याची नोटीस देतात. तसेच समितीचे अधिकारी-कर्मचारी अनधिकृत बांधकामांच्या कारवाईला गेल्यानंतर काही संचालक फोन करून संबंधित बांधकाम न पाडण्याच्या सूचना देत असल्याची चर्चा बाजार समितीत आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना नेमके कोणाचे ऐकायचं हा प्रश्न पडत आहे.

अनधिकृत असलेल्या बांधकांमावर निष्कासन कारवाई केली जाईल. अनधिकृत बांधकामांबाबत वेळोवेळी संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या जातात.

- डॉ.राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT