kirtan sakal
पुणे

Pune News : कीर्तनातून प्रबोधन,भजनी मंडळांचाही समावेश

गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या व्याख्याने, कीर्तने यातून संत आणि समाज सुधारकांनी प्रबोधन केले

सकाळ वृत्तसेवा

स्वारगेट - ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या गणेशोत्सवाने लोकांचे प्रबोधन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या व्याख्याने, कीर्तने यातून संत आणि समाज सुधारकांनी प्रबोधन केले. मध्यंतरी ही परंपरा खंडित झाली होती. मात्र, पुन्हा एकदा कीर्तनाच्या कार्यक्रमांची संख्या वाढू लागली आहे. भजनी मंडळांच्या कार्यक्रमांचेही आयोजन गणेश मंडळे करीत आहेत.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करताना देशाच्या स्वातंत्र्य चळवळीशी उत्सवाला जोडून त्याद्वारे समाजात देशप्रेमाचे स्फुल्लिंग चेतविले. उत्सवाला प्रबोधनाची जोड देऊन लोकांना चळवळीत सहभागी करून घेतले. हा देदीप्यमान वारसा पुढे व्याख्याने, शाहिरी जलसा यांच्या रूपाने सुरू होता.

मात्र, त्यानंतरच्या काळात उत्सवाच्या पद्धतीत बदल झाला आणि ही परंपरा थांबली. मात्र, आता पुन्हा एकदा गणेशोत्सवासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आखताना मंडळे आवर्जून कीर्तन-भजनांचा समावेश करतात.

प्रसिद्ध कीर्तनकार आणि भजनी मंडळांना या कार्यक्रमांसाठी आमंत्रित केले जात आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व जण यात सामील होण्यासाठी उत्सुक असतात. मंडळांसह काही सोसायट्यांमध्ये देखील या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

गेली अनेक वर्षे मी कीर्तनातून संतांचे चरित्र आणि विचार सांगण्याचे काम करत आहे. मनोरंजनातून प्रबोधन होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह तरुण मुलेही या कार्यक्रमाला आवर्जून येतात.

ज्ञानेश्वर महाराज जांभळे, युवा कीर्तनकार

आम्ही अनेक वर्षांपासून भजनी मंडळ चालवत असून त्याद्वारे संत विचारांच्या प्रसाराचे काम करतो. शहरातून भजनी मंडळांना मागणी वाढते आहे. कीर्तन, भजनाच्या माध्यमातून गणेश मंडळे चांगले काम करत आहेत.

गणेश कदम, अध्यक्ष, संत तुकाराम महाराज भजनी मंडळ, आळंदी

गणपती मंडळे कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करत आहेत, ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. यातून मुलांना संतांची ओळख होते, परंपरेची माहिती कळते. इतिहासाविषयी त्यांच्यात गोडी वाढते.

निनाद जोशी, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT