परीक्षा केंद्रावर खाकी वर्दीला फुटला पाझर  sakal
पुणे

उंड्री : परीक्षा केंद्रावर खाकी वर्दीला फुटला पाझर

पुण्यात पोलीस शिपाईपदाच्या भरती परीक्षेदरम्यान अधिकाऱ्यांची शिष्टाई

सकाळ वृत्तसेवा

उंड्री : परीक्षा केंद्रावर खाकी वर्दीला फुटला पाझर

पुण्यात पोलीस शिपाईपदाच्या भरती परीक्षेदरम्यान अधिकाऱ्यांची शिष्टाई

उंड्री : वेळ सकाळी ११.०० अन् स्थळ ः सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा-पुणे येथे एक महिला तान्ह्या बाळाला घेऊन परीक्षा केंद्रावर पोहोचली... त्या बाळाला वडिलांकडे स्वाधीन करीत परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देण्यासाठी आई गेली.... सहा महिन्याच्या बाळाने भुकेने टाहो फोडला. आईची घालमेल अन् पोलीस अधिकारी आणि उपस्थितांच्या नजरा बाळाकडे लागल्या. तेवढ्यात कर्तव्यदक्ष अधिकारी येतात आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच भुकेने व्याकूळ झालेल्या बाळाला आईच्या स्वाधीन केले. त्यानंतर तिने बाळाला पाजून शांत केले...

गुन्हे शाखेच्या युनिट-५चे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे म्हणाले की, कोंढव्यातील सिंहगड सिटी स्कूलमध्ये पुणे पोलीस शिपाई पदाची परीक्षा होती. त्यासाठी गडचिरोली, नागपूर, बुलढाणा, नंदूरबार, धुळे, औरंगाबाद, जालना अशा ठिकाणांहून उमेदवार आले होते. उमेदवारांनी २०१९ साली परीक्षेसाठी अर्ज केले होते. मात्र, परीक्षा झाली नव्हती, ती आज (मंगळवार, दि. ५ ऑक्टोबर २०२१) घेण्यात आली. या परीक्षेसाठी महिला उमेदवाराने अर्ज केला होता. दरम्यान, तिचे लग्न झाले आणि ती सहा महिन्याच्या बाळाला घेऊन पतीसोबत परीक्षा देण्यासाठी आली होती. महिला परीक्षा केंद्रामध्ये गेली आणि बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून महिलेची घालमेल आणि दुसरीकडे परीक्षेचा पेपर देण्याची वेळ जवळ आली होती, अशा दुहेरी कात्रीत सापडलेली माता बाळा शांत केल्याशिवाय पेपर देऊ शकत नव्हती. पेपर सुरू होण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ होता. मात्र, नियमानुसार कोणालाही आतमध्ये सोडता येत नव्हते. उमेदवार सोडून परीक्षा हॉलमध्ये कोणालाही प्रवेश देता येत नव्हता. मात्र, पोलीस निरीक्षक जनार्दन जानकर यांच्या सहमतीने कायद्याच्या चौकटीत राहून महिलेच्या पतीला बाळा घेऊन परीक्षा केंद्रामध्ये पाठवले. दरम्यान, त्या महिला उमेदवाराला विशेष रूममध्ये बोलावले. तिने बाळाला पाजून शांत केले. त्यानंतर ती पेपर देण्यासाठी परीक्षा हॉलमध्ये गेली आणि शांतेत पेपर देऊन आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले. पोलीस अधिकारीसुद्धा माणूसच असतो, याचे भान कायद्याच्या चौकटीत राहून करावे लागले, ही गोष्ट शिकायला मिळाली.

दरम्यान, महिलेने बाळा हातात घेतले आणि सांगितले की, बाळाच्या रडण्याचा आवाज मला स्वस्थ बसू देत नव्हता. बाळाला दूध पाजले नसते तर मी पेपर लिहू शकले नसते. खाकी वर्दीतही माणुसकी लपली आहे, असे सांगत तिने पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

SCROLL FOR NEXT