पुणे

‘आई, तिला विचार तू का आलीस?’

मीनाक्षी गुरव

पुणे - मध्यरात्री अचानक तनया उठली आणि रडायला लागली. काय झालं, असं मी तिला विचारलं. ती म्हणाली, ‘‘माझी ‘ती’ आई आहे ना! ती येतीयं, तू तिला विचार ती का येतीयं?’’ तिची समजूत काढत मी तिला शांत केलं. अवघ्या साडेसहा वर्षांची तनया हे आत्तापासूनच स्वीकारत असली, तरीही तिच्या येण्याने माझं आयुष्य मात्र परिपूर्ण झाल्याची जाणीव मला नेहमी बळ देते,’’ असे ‘सिंगल पॅरेंट’  असणाऱ्या सोनाली जाधव (नाव बदललेले आहे) यांचे म्हणणे आहे.

तनयाच्या असण्यानंच माझं आयुष्य खऱ्या अर्थाने फुललं आहे. आपण पालक असलो तरीही ‘पालकत्व कसं असावं’, ‘आयुष्य कसं जगावं’, हे तिच्या असण्यामुळेच मला कळतं, असेही सोनाली यांनी अधोरेखित केले. ‘लग्न करायचेच नाही’, हे सोनाली यांनी आधीच ठरविले होते. खरंतर सोनाली आयटी क्षेत्रात कार्यरत असतानाच विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहेत. 

लग्न करायचे नाही, हा निर्णय त्यांनी घेतला होता; परंतु त्यांना पालकत्व हवे होते. म्हणून ‘बाय चॉइस’ त्यांनी बाळ दत्तक घेण्याचे ठरविले. ‘एक आई म्हणून मुलीलाच अधिक समजून घेऊ शकेन, असे मला नेहमी वाटायचे म्हणून मुलीलाच दत्तक घेण्याचे ठरविले,’’ असे सोनाली यांनी सांगितले. 

मुलगी दत्तक घेण्यासाठी त्यांनी मे २०१० मध्ये रीतसर अर्ज केला. सोफोश संस्थेत अवघ्या पाच महिन्यांची तन्मयी (नाव बदललेले आहे) १ जुलै २०११ रोजी त्यांच्या घरात आली आणि तन्मयीची तनया (नाव बदललेले आहे) झाली. तिला दत्तक घेणे ही माझी भावनिक गरज होती. तिच्यामुळे आज आयुष्य परिपूर्ण  झाल्याची भावना सोनाली यांनी व्यक्त केली.

‘‘आई मला बाबा का नाहीत?’’, ‘‘ती आई आली तर?’’, असे अनेक प्रश्‍न तिला भंडावून सोडत असले, तरीही त्यांची उत्तरे मिळाल्यानंतर तनया अवघ्या साडेसहा वर्षांतच वस्तुस्थिती स्वीकारत आहे. माझी लेक आयुष्य पूर्ण करते आणि मला पालकत्व कसे असावे, हे शिकविते. तिच्याचमुळे पालकत्व आणि शिक्षण विषयात अभ्यास सुरू केला. माझी लेक माझा अभिमान बनली आहे, असेही सोनाली यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अण्णांच्या आंदोलनाला BJP-RSSचा छुपा पाठिंबा, सोनिया गांधींच्या पुस्तकात उल्लेख; अण्णा हजारे म्हणाले, कोण...

iPhone 18e बद्दल 'हे' वाचलंत का? A20 चिप, 24MP सेल्फी कॅमेऱ्यासह आयफोन; पण 'या' एका कारणामुळे युजर्स होणार का नाराज?

Water Storage: मिर्झापूर प्रकल्पात केवळ ११ टक्के जलसाठा ;दुष्काळी स्थितीने चिंता वाढविली; उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईचे सावट

Hardik Pandya : पंजाब किंग्सकडे जाताच हार्दिकची भन्नाट पोस्ट... सर्वांची बोलती केली बंद; असं काय लिहिलंय त्याने?

Mumbai Fire: मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या शासकीय बंगल्यात आग; एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना

SCROLL FOR NEXT