pune news  sakal
पुणे

Pune News : पानशेत रस्त्यावरील अपघातात कार खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळल्याने मुलीचा मृत्यू

कुटुंबातील इतर चौघांना स्थानिकांनी वाचविले; सातत्याने अपघात होत असताना प्रशासनाचे उपाययोजनांकडे दुर्लक्ष .

निलेश बोरुडे

सिंहगड: पुणे-पानशेत रस्त्यावरील कुरण बुद्रुक गावच्या हद्दीत कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात संस्कृती प्रदीप पवार (वय 12, रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे.)

हीचा मृत्यू झाला असून मुळशी व सिंहगड आपत्ती व्यवस्थापन समिती, पीएमआरडीए अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करुन रात्री उशिरा तिचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. याबाबत वेल्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नांदेड सिटी येथे राहणारे प्रदीप पवार हे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रक्षाबंधनासाठी पत्नी अर्चना , मुलगा प्रद्युम्न,मुलगी संस्कृती व बहीण सुनीता नारायण शिंदे यांसह कारने पानशेत या आपल्या मुळ गावी जात होते. कुरण बुद्रुक गावच्या हद्दीत माऊलाई मंदिराजवळ अचानक पवार यांच्या कारचे उजव्या बाजूचे टायर फुटल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली.

अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूला असलेले स्थानिक मदतीसाठी धावले. प्रदीप पवार, अर्चना पवार, प्रद्युम्न पवार व सुनीता शिंदे यांना वाचविण्यात यश आले मात्र संस्कृती गाडीतच अडकून राहिली होती .

मुळशी व सिंहगड आपत्ती व्यवस्थापन समितीचे महेश ठाकर, राजेंद्र ठाकर, गणेश सपकाळ, भूषण निवंगुणे, दत्ता ठाकर, संदीप सोलस्कर, उमेश ठाकर, प्रमोद बलकवडे, अमर मोरे, हनुमंत नवले, अभिजित खोले, पीएमआरडीए अग्निशमन दलाचे विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील, सोन्याबापू नागरे, सूरज माने, राहुल शिरोळे, अक्षय काळे, पंकज माळी, श्रीकांत अधाऊ, किशोर काळभोर, वेल्हे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पठारे, पोलीस कर्मचारी कांतिलाल कोळपे,पंकज मोघे व इतरांनी

शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशिरा खोल पाण्यात बुडालेली कार शोधून बाहेर काढली. कारमध्ये संस्कृतीचा मृतदेह आढळून आला. ‌याबाबत वेल्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

सातत्याने अपघात होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष. पुणे-पानशेत रस्त्यावर धोकादायक वळणे व सुरक्षेबाबत उपाययोजना नसल्याने अपघात झाल्यानंतर वाहने खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळून आठ ते दहा नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. असे असताना प्रशासनाने अद्यापपर्यंत याबाबत गांभीर्याने दखल घेतलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Super 8s Schedule : भारतीय संघाचे 'सुपर ८' मधील वेळापत्रक ठरले; बघा कोणत्या तीन संघांचा सामना करणार अन् कधी...

Buldhana Crime: हुंड्याच्या छळामुळे विवाहितेने संपवले जीवन; पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तुम्हालाही राग येतो? हृदय विकाराचा वाढतो धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Update : राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता

Sangli Fire : नशेखोरांकडून मोकळ्या इमारतीत आग; भरदिवसा धिंगाणा, महापालिकेच्‍या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आग

SCROLL FOR NEXT