Breaking News  Sakal
पुणे

Pune News : सिंहगड रोड परिसरात गोळीबाराने खळबळ; एक जखमी

सकाळ डिजिटल टीम

सिंहगड पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस हाकेच्या अंतरावर मंगळवारी भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. सनसिटी सोसायटीसमोर मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेमुळे सिंहगड रस्ता परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

या संदर्भात प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनसिटी सोसायटीसमोर ऑटो सर्विसेसचे दुकान आहे. या दुकानाजवळ संतोष पवार नावाच्या व्यक्तीने अंगरक्षकाची पिस्तूल घेऊन त्यातून चार राउंड फायर केले. त्यात रमेश बद्रिनाथ राठोड याच्या पायावर दोन गोळ्या झाडल्या.

त्यात रमेश राठोड गंभीर जखमी झाला आहे. त्याला सिंहगड रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार घडल्यानंतर घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी घाबरून पळ काढला. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याचे समजते.

या घटनेत एकजण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, कल्याणीनगरमध्येही सोमवारी रात्री एका व्यावसायिकाने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. याबाबत येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT