पुणे

भेकराईनगरजवळ अपघातात महिलेचा मृत्यू 

सकाळवृत्तसेवा

हडपसर - साखरपुड्याचा कार्यक्रम आटपून घरी येत असताना ट्रकचा धक्का बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्य्‌ झाला, तर तिचे पती व सहा वर्षांचा मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात सासवड रस्त्यावर भेकराईनगर येथे विठ्ठल पेट्रोल पंपासमोर मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडला. 

सारिका शिवाजी वाघेले (वय 31, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. महिलेचा पती शिवाजी अंकुश वाघेले (वय 38) व मुलगा यशराज (वय 6) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी ट्रकचालक नाथा मल्लप्पा कनपट्टी (वय 25, रा. घुगाव, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) याला अटक केली. 

तिघे जण वडकी येथून साखरपुड्याचा कार्यक्रम आटपून घरी येत होते. त्या वेळी रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात मागून येणाऱ्या ट्रकचा धक्का बसून दुचाकी खाली पडली. यात सारिका या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा पती व मुलगा दुसऱ्या बाजूला पडल्याने बचावले. 

वीस दिवसांतील चौथा बळी 
सासवड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वीस दिवसांत झालेल्या अपघातात आतापर्यंत चार बळी घेतले आहेत. पुणे-सासवड रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर खडी वर आली आहे. त्यामुळे अपघात व जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. हा रस्ता नुकताच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग झाला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरण व दुरुस्तीकडे दोन्ही विभागाचे दुर्लक्ष होत असल्यानेच अपघात होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Ring Road : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वीच नाशिकमध्ये कायदेशीर पेच! 40 हून अधिक शेतकऱ्यांची हायकोर्टात धाव; बाह्य रिंगरोडच्या कामाला लागणार ब्रेक?

पहाटे ३ वाजता झोपणे, सकाळी ७ वाजता उठणे.... CJI SuryaKant यांचा १८ तासांचा ‘नॉनस्टॉप’ दिनक्रम; सहकारी न्यायाधीशही थक्क

Latest Marathi News Live Update : भिवंडीच्या मूलचंद कंपाऊंडमध्ये ऑइलच्या गोदामाला भीषण आग

अयानचा आणखी एक कारनामा उघड; थार गाडी, नोटांचे बंडल अन् पिस्तूल आली कुठून? मोठा खुलासा...

Gold Rate Today: उच्चांकापासून सोनं 25 हजारांनी स्वस्त! आजचा 1 तोळ्याचा ताजा भाव काय?

SCROLL FOR NEXT