पुणे

माझ्या प्रत्येक गाण्यात "त्यांची' सावली 

सकाळवृत्तसेवा

पुणे - ""ज्यांच्यामुळे मला गायक-संगीतकार ही ओळख मिळाली, ज्यांच्यामुळे मी आज इथवर आलो, "भावगंधर्व' पदवीपासून "पद्मश्री'पर्यंतचे सन्मान मिळाले, असे माझे वडील मास्टर दीनानाथ यांची सावली माझ्या प्रत्येक गाण्यात असते. त्यांची आठवण आज जास्तच येत आहे,'' अशा भावना संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केल्या. 

पुणे भारत गायन समाजाचा पं. राम मराठे स्मृती पुरस्कार संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना पं. शंकर अभ्यंकर यांचा हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी गायक पं. सत्यशील देशपांडे, संगीत संयोजक अमर हळदीपूर, संस्थेच्या अध्यक्ष शैला दातार उपस्थित होत्या. 

मंगेशकर म्हणाले, ""संगीत क्षेत्रात वेगळा ठसा उमटवलेले राम मराठे यांच्या नावाचा पुरस्कार मिळावा, हा कुठल्याही गायकाच्या आयुष्यात आनंदाचा आणि भाग्याचा क्षण असतो. या पुरस्कारासाठी मी योग्य आहे की नाही, हे माझे गाणेच ठरवेल.'' 

"मराठे यांना गाताना ऐकले आहे. विलक्षण तान त्यांच्याकडे होती. मला वेगवेगळ्या गायकांचे गाणे ऐकायला आवडते. चांगले असले तर ते गाणे पुनःपुन्हा ऐकतो, असेही ते म्हणाले. 

अभ्यंकर म्हणाले, ""हृदयनाथ मंगेशकर हे संगीतातील एक अवलिया माणूस आहेत. मा. दीनानाथांप्रमाणेच ते स्वयंभू आहेत. त्यांच्या रचना मन थक्क करणाऱ्या, अद्भुत आहेत. त्यांनी स्वतःची वेगळी वाट निर्माण केली आहे. असे गायक पुढे निर्माण होतील की नाही याबाबत मनात शंका आहे.'' देशपांडे म्हणाले, ""अभिजात आणि सुगम यांच्यात विनाकारण द्वंद्व निर्माण केले जाते; पण या पुरस्कारामुळे त्या कल्पनेला तिलांजली मिळाली, असे वाटते.'' 

दरम्यान, दृकश्राव्य माध्यमातून लता मंगेशकर यांनीही रसिकांशी संवाद साधला. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. शिल्पा पुणतांबेकर यांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: शुभमन गिलला चेंडू लागला, उपचार घेण्यासाठी धावला! भारताच्या सराव सत्रात आज बरंच काही घडलं, वाचा...

पुरस्कार सोहळ्यात नाना पाटेकरांनी माधुरीची घेतली फिरकी, म्हणालेले... 'तुला खुप मिळाले पण...'

Shiv Sena Symbol Case :'शिवसेने'वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, एकनाथ शिंदे दरे गावी | Eknath Shinde

Marathi News Live Updates : 'सुभाष देसाई' प्रकरणात या न्यायालयाने अपात्रतेचा प्रश्न हाताळला नव्हता - न्यायमूर्ती

Retired Cricketer Pension : सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग की सौरव गांगुली, कोणाला मिळते सर्वाधिक निवृत्तीवेतन?

SCROLL FOR NEXT