solar power  
पुणे

इंदापुरात राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प

सकाळवृत्तसेवा

भिगवण - "जलविद्युत प्रकल्पाला मर्यादा आहेत. तर कोळशापासून वीजनिमिर्ती करताना प्रदूषण व कच्च्या मालाच्या उपलब्धतेसारख्या समस्या आहेत. राज्याची विजेची वाढती गरज लक्षात घेता साैरउर्जा हा सध्या उत्तम पर्याय आहे. मदनवाडी (ता. इंदापूर) येथे राज्यातील सर्वांत मोठा साैरउर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे, ही आनंदाची बाब आहे. त्याच्या यशस्वितेसाठी कंपनीने शेतकरयांना प्रकल्पामध्ये सहभागी करुन घेतल्यास कंपनी व शेतकरी या दोघांचाही फायदा होईल,'' असे मत राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.

मदनवाडी (ता. इंदापूर) येथे कॅप्चर सोलर एनर्जी कंपनीच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या 150 मेगावॉट सौर प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रय भरणे होते. भाजपचे मारुती वणवे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ, मनसेचे अॅंड. सुधीर पाटसकर, प्रकाश ढवळे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, बाजार समितीचे संचालक आबासाहेब देवकाते, मदनवाडीच्या सरपंच सारिका बंडगर, कॅप्चर सोलर एनर्जीचे चेअरमन राजू भोसले, संचालक राजेंद्र बळीनवर, वासुदेव भोसले उपस्थित होते. 

शिवतारे म्हणाले, ``येथील प्रकल्प हा शेतकऱयांच्या जमिनी भाडे तत्वावर घेऊन उभारण्यात येत आहे त्यामुळे प्रकल्प उभा करत असताना त्यांना त्रास होऊ नये, याची काळजी संचालकांनी घ्यावी.`` आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, ``मदनवाडी येथे सुमारे एक हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पामुळे या भागाच्या विकासास मदत होणार आहे. प्रकल्पामुळे 500 स्थानिक तरुणांना रोजगारांच्या संधी मिळणार आहेत. कंपनीच्या उभारणीनंतर मदनवाडीच्या माळरानावर समृध्दी येऊन येथील शेतकऱयांना निश्चित लाभ होईल.``

राजू भोसले म्हणाले, ``प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे  निरसन करण्यात येईल. त्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प चालविण्यात येईल. प्रकल्पासाठी 80 टक्के स्थानिकांना रोजगार मिळेल. त्याबरोबर या भागाच्या विकासासाठीही प्रकल्पाच्या माध्यमातून हातभार लावण्याचा प्रयत्न राहिल``

बाळासाहेब धुमाळ, प्रकाश ढवळे यांनीही मनोगत व्यक्त केले. कंपनीचे संचालक राजेंद्र बळीनवर यांनी प्रास्ताविक केले. डी.के. भोसले यांनी आभार मानले.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये : 

- राज्यातील सर्वांत मोठा सौरउर्जा प्रकल्प.
- 120 मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमता.
- एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक.
- पाचशे स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT