pune sakal
पुणे

Pune News : ‘खडकवासला धरणात फेकलेल्या औषध साठ्याप्रकरणी चौकशी करावी’

राष्ट्रवादीच्या अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे दिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे- खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुदतबाह्य औषधे व इंजेक्‍शनचा साठा सापडण्याचा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच धरण व जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याची रासायनिक तपासणी करून अहवाल तयार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (शरद पवार गट) महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आली.

राष्ट्रवादीच्या अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे दिले आहे. खडकवासला धरण परिसरातील गावांमधून प्रदूषित पाणी धरणात सोडले जात आहे, याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यावर महापालिकेने अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही.

आता पाणलोट क्षेत्रात मुदतबाह्य औषधसाठा सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने संबंधित प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी. हा गैरप्रकार करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच, धरणातील पाणी व सर्व जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याची त्वरित तपासणी करावी, आवश्‍यक ठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात यावी, असेही कदम यांनी आपल्या निवेदनात नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT