pune sakal
पुणे

Pune News : ओतूर येथे बिबट्याने केला महिलेवर हल्ला

बिबट्याचा पंजाचे नख लागल्याने किरकोळ जखमी झाल्या आहेत.

पराग जगताप

ओतूर - ता.जुन्नर येथे बिबट्याचा दुचाकीवर हल्ला महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती वनक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.तसेच वनविभागाकडून या परीसरात सोमवारी सकाळी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा ही लावण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

सदर बिबट्याचा हल्ला रविवारी रात्री ओतूर घुलेपट मार्गावर झाला असून यात मनिषा गंगाराम तांबे वय.४५ ह्या बिबट्याचा पंजाचे नख लागल्याने किरकोळ जखमी झाल्या आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी रात्री

ओतूर येथील घुलेपट येथे गंगाराम तांबे हे पत्नी मनिषा सह दुचाकीवर घरी चालले असतात अचानक ऊसात दबाधरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर झेप घेऊन हल्ला केला.यात बिबट्याच्या पंजाचे नख मनिषा तांबे यांच्या पायाला लागले.सदर घटना सजताच ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, वनपाल सुधाकर गिते, वनरक्षक सुदाम राठोड, विश्वनाथ बेले, किसन खरोडे यानी जागेवर जाऊन पहाणी केली.तसेच जखमी तांबे यांना प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर येथे नेऊन उपचार करुन बिबट प्रतिबंधक लस देण्यासाठी व इतर उपचारासाठी जुन्नर नेले.

सदर परिसरात ओतूर वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला आहे.ओतूर घुलेपट परीसर बिबट प्रवन क्षेत्रात येत असल्याने नागरीकांनी रात्री घरासमोर लाईट लाववी ,बरोबर बॅटरी असावी,एकटे फिरु नये,समुहाने फिरावे शक्य नसल्यास मोबाईल किंवा मोठ्या आवाजाचे यंत्र बरोबर ठेवून मोठा करावा,पशुधन व दुभत्या जनावरांचा गोठा बंदिस्त गोठ्यात ठेवावा असे आवाहन वनविभागाकडुन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT