pune sakal
पुणे

Pune News : भराडी परिसरात बिबट्याचे हल्ले,वनविभागाचे दुर्लक्ष

भराडी परिसरात बिबट्याचे हल्ले काही थांबेना आणि वनविभाग काही पिंजरा लावेना

सकाळ वृत्तसेवा

भराडी - परिसरात बिबट्याचे हल्ले काही थांबेना आणि वनविभाग काही पिंजरा लावेना. नवनाथ भेके,निरगुडसर निरगुडसर ता.२२ भराडी ता.आंबेगाव येथील जांभळे मळा येथील शेतकरी प्रदीप दत्तात्रय लोंढे या शेतकऱ्याच्या तीन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना शुक्रवार ता.२२ रोजी पहाटे घडली.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

यामुळे संबधित शेतकऱ्याचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. भराडी परिसरात बिबट्याचे हल्ले काही थांबेना आणि वनविभाग काही पिंजरा लावेना,बिबट्याचे हल्ले वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आंबेगाव तालुक्यातील भराडी गावानजीक असलेल्या जांभळे मळा येथे शुक्रवारी पहाटे प्रदीप दत्तात्रय लोंढे यांचा तीन ते चार वर्षाच्या तीन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून ठार केले.

घटनेची माहिती पोलिस पाटील संतोष खिलारी यांनी वनविभागाला दिली. शुक्रवारी सकाळी वनविभागाकडून मृत शेळ्यांचा पंचनामा करण्यात आला. भराडी परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून गेल्या दीड महिन्यात तीन कालवडी आणि तीन शेळ्या बिबट्याने ठार केल्या आहेत बिबट्याचे हल्ले होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तरी देखील वनविभाग याकडे कानाडोळा करताना दिसत आहे.पिंजरा लावण्याची मागणी करून देखील पिंजरा लावण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT