पुणे

हवाई मालवाहतूक करणे झाले सोपे 

सकाळवृत्तसेवा

पुणे - लोहगाव विमानतळावर उभारलेल्या हवाई मालवाहतूक केंद्राचे बुधवारी सीमा शुल्क विभागाचे मुख्य आयुक्त ए. के. पांडे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. हे केंद्र सुरू झाल्यामुळे पुण्यातून मध्यपूर्व देशात शेतीमाल, तर युरोप देशात यंत्रसामग्रीची निर्यात करणे सोयीचे होणार आहे. 

यावेळी सीमा शुल्क विभाग, विमानतळ प्राधिकरण, मराठा चेंबरचे पदाधिकारी उपस्थित होते. सध्या पुण्यातून चार आंतरराष्ट्रीय विमानसेवा दुबई, अबुधाबी, फ्रॅंकफर्ट येथे सुरू आहेत. त्यामुळे लोहगाव विमानतळावरून हवाई मालवाहतूक केंद्र सुरू करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. अखेर ती पूर्ण झाली असून हे केंद्र अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त आहे. येथे दररोज चार टन मालाची हाताळणी करणे शक्‍य होणार आहे. हे केंद्र सुरू झाल्यामुळे मुंबई येथून निर्यातीसाठी लागणारा वेळ आणि होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत मोठी बचत होणार आहे. सध्या या केंद्रातून केवळ निर्यातीला परवानगी दिली असून लवकरच आयातीसही परवानगी देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live Updates Marathi : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावर काँग्रेसचं आंदोलन

Manchar Power Cuts: मंचर शहरात दररोज पाच-सहा वेळा वीज खंडित; २० हजार ग्राहक हैराण, रुग्णालये व व्यवसायांवर मोठा परिणाम

Cyber Crime : सायबर चोरट्यांना बँक खाते वापरण्यास देऊन एक कोटी ३२ लाखांची फसवणूक

Kanersar Health Camp: कनेरसरमध्ये मोफत आरोग्य शिबिर, वह्या वाटप व गुणवंतांचा सत्कार; मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रम

Cooperative Reforms: बदलत्या आर्थिक काळात पतसंस्था व बँकांनी सक्षम, पारदर्शक व व्यावसायिक होण्याचे प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT