Satish-Aalekar 
पुणे

आळेकरांचे ‘महानिर्वाण’ पुन्हा रंगभूमीवर

सुशांत सांगवे

पुणे - मराठी रंगभूमीवरील ‘माइलस्टोन’ समजल्या जाणाऱ्या काही नाटकांपैकी एक, ज्या नाटकाने रंगभूमीला नवा आयाम मिळवून दिला, रूढी-परंपरांचे आणि मानसिकतेचे भारतातील विविध भाषांतून दर्शन घडविले असे ‘महानिर्वाण’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. विशेष म्हणजे, नाटककार सतीश आळेकर यांनीच या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली असून, या नाटकासाठी पुण्यातील युवा रंगकर्मी आणि ‘नाटक कंपनी’ने पुढाकार घेतला आहे.

सुतकाचं कीर्तन आणि मृत्यू या विषयांभोवती रचलेले, अतिशय प्रभावी लेखन असलेले ‘महानिर्वाण’ हे नाटक अशा एका मृत व्यक्तीची कथा सांगते, ज्याला एका विशिष्ट प्रकारेच स्वतःचे अंत्यसंस्कार व्हावे असे वाटते. त्याप्रकारे अंत्यसंस्कार होईपर्यंत त्याचे पार्थिव तसेच ठेवले जाते.

त्यानंतरच्या अनेक घडामोडींतून हे नाटक पुढे जाते आणि समाजातील मानसिकतेचे दर्शन घडवते. आशय, भाषा, रचना या दृष्टीने हे नाटक अर्थपूर्ण आहे. त्यामुळे रंगभूमीच्या संदर्भात हे नाटक आजही महत्त्वाचा टप्पा मानले जाते.

आळेकर म्हणाले, ‘‘हे नाटक १९७४ मधले. तेव्हाच्या राज्य नाट्य स्पर्धेत ते प्रथम सादर झाले होते. ‘घाशीराम’सोबत अनेक वर्षे याचे प्रयोग झाले. जवळपास ३६ वर्षांनंतर याचे प्रयोग आम्ही वेगवेगळ्या कारणांमुळे थांबविले; पण इतक्‍या वर्षांनंतर हे नाटक पुन्हा नव्या पिढीला करावेसे वाटत आहे.

त्यामुळे नव्या ‘टीम’सह हे नाटक प्रेक्षकांसमोर आणत आहोत. संगीतकार आनंद मोडक यांनी संगीत दिलेले हे पहिले नाटक होते. त्यामुळे या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनाच आम्ही समर्पित करत आहोत.’’ विनोद दोशी नाट्य महोत्सव १९ ते २३ फेब्रुवारीदरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगणार आहे. त्यात सोमवारी (ता. १९) सायंकाळी साडेसात वाजता होणाऱ्या या नाटकात देवस्थळी, सायली फाटक, सिद्धार्थ महाशब्दे, भक्‍तिप्रसाद देशमाने यांच्यासह नव्या पिढीतील कलाकार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा रक्तरंजित संघर्ष! दोन गटांत भीषण गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, तणाव वाढणार?

IND vs NZ: ईशान किशनने सूर्यकुमारला टाकलं मागे अन् असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

Drought Crisis: टंचाईच्या स्थितीतून बळीराजाला सावरण्याचा प्रयत्न ;शरद पवार यांचा दौरा सुरु

Latest Marathi News Update : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माढा तालुक्यात केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी, शेतकऱ्यांशी साधला संवाद

IND vs NZ ODI: टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया पुन्हा सज्ज! पहिला वनडे सामना कधी, कुठे अन् किती वाजता? लाईव्ह सामना टीव्ही मोबाईलवर कुठे पाहता येणार?

SCROLL FOR NEXT