पुणे

मानसीची रिक्षातून रंगमंचावर "एंट्री' 

सकाळवृत्तसेवा

पुणे -  गणेश वंदन, आई जगदंबेचा गोंधळ, शिवशक्ती वंदना अशा भक्तिगीतापासून "वाट बघतो रिक्षावाला' आणि "बाई वाड्यावर या' यांसारख्या थिरकावयाला लावणाऱ्या गीतांच्या सादरीकरणाने गुरुवारी पुणे नवरात्रोत्सवास जल्लोषमय वातावरणात सुरवात झाली. 

विविध कलांचा संगम असलेल्या या महोत्सवाचे उद्‌घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. त्या आधी अभिनेत्री भार्गवी चिरमुले, तेजा देवकर, मानसी नाईक, श्‍वेता शिंदे, अभिज्ञा भावे यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करीत नवरात्रोत्सवात रंग भरला. मानसी नाईक हिने गणेश कला क्रीडा मंचावर रिक्षातून केलेली "एंट्री' त्यानंतर मान्यवरांच्या आणि प्रेक्षकांमध्ये जाऊन केलेल्या नृत्यामुळे पुणेकरांची सायंकाळी रमणीय ठरली. या वेळी महापौर मुक्ता टिळक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शरद रणपिसे, उल्हास पवार, माधुरी मिसाळ, मोहन जोशी, अंकुश काकडे, अभिनेत्री किशोरी शहाणे, महोत्सवाचे आयोजक आबा बागूल, जयश्री बागूल यांच्यासह नेते मंडळी उपस्थित होती. 

या वेळी अभिनेते सुबोध भावे, क्रिकेटपटू मोना मेश्राम, पुरुषोत्तम पाटील, बरखा जळगावकर आणि विवेक वेलणकर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते "जीवन गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी हर्षवर्धन पाटील, पालकमंत्री बापट, उल्हास पवार, महापौर यांची भाषणे झाली. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. 

हुशार माणसे विरोधी पक्षातच बरे 
पालकमंत्री बापट यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत बागूल यांचे कौतुक करतानाच काम करीत राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, ""अशी हुशार माणसे आपल्याकडे घेण्याऐवजी विरोधी पक्षातच ठेवलेले बरे असतात; परंतु ते अजून नगरसेवकच का राहिले?, हे मात्र कळले नाही. त्याबाबत मी उल्हास पवार आणि हर्षवर्धन पाटील यांना विचारणार आहे. आता मात्र परिस्थिती अवघड आहे. त्यामुळे आहे त्याच पक्षात तू काम करीत राहा.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूची फलंदाजी कोलमडली; अवघ्या 24 धावांत गमावल्या 6 विकेट्स, विराटचं अर्धशतकही हुकलं

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT