Pune Fire News 
पुणे

Pune Fire News: मार्केटयार्डात मध्यरात्री पुन्हा भीषण आग; दोन कामगारांचा होरपळून मृत्यू

पुण्यात मध्यरात्री अग्नितांडव, मार्केटमधील हॉटेलला भीषण आग;

धनश्री ओतारी

पुण्यातील मार्केटयार्डात मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत हॉटेलमधील ३ कामगार होरपळले असून यातील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. (Pune News Marketyard Hotel Fire breaks out midnight 2 workers death one injured)

पुण्यात मध्यराञी एक वाजण्याच्या आसपास मार्केटयार्ड, गेट नंबर येथील एका हॉटेलला आग लागली. या घटनेत आतमध्ये पोटमाळ्यावर झोपलेल्या 3 कामगारांना जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर एकावर उपचार सुरु आहे.

आगीची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. ही आग कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही.

मुन्ना राठोड आणि संदीप अशी मृत कामगारांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील मार्केटयार्ड परिसरातील रेवण हॉटेल आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास या हॉटेलला अचानक आग लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT