पुणे

'रंगभूमी हे अभिनयाला सामर्थ्य देणारे माध्यम'

राज काझी

पुणे - रंगभूमी हे अभिनेत्याची ताकद वाढवणारे माध्यम आहे. नवनव्या भूमिकांमधून अभिनयकलेचा कस लागतो व त्यातूनच नटाच्या अभिनयाचे सामर्थ्य वाढीस लागते. टीव्ही व चित्रपटांकडे जाऊ इच्छिणाऱ्या कलावंतांनी रंगभूमीवर पुरेसे धडे गिरवणे आवश्‍यक आहे. सशक्त अभिनेत्याची कारकीर्द दीर्घ असते. नाटकातील कलाकार इतर सर्व माध्यमांत लीलया वावरू शकतात. ज्येष्ठ अभिनेते व नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी हे मत व्यक्त केले. 

प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे पुरस्कार यंदा मोहन जोशी यांना घोषित झाला आहे. "सकाळ'ने अभीष्टचिंतनासाठी आमंत्रित केलेल्या भेटीत त्यांनी रंगभूमीपासून महाराष्ट्रातल्या आजच्या सांस्कृतिक परिस्थितीपर्यंत अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. "हौशी किंवा प्रायोगिक अशा लेबलात व परिघात रंगकर्मींनी फार अडकून राहू नये, असाही सल्ला त्यांनी दिला. 

हौशी रंगभूमी ते हिंदी चित्रपटांची प्रदीर्घ कारकीर्द यामध्ये पुण्यातून गाठीस घेतलेल्या अनेक गोष्टींचा वाटा मोठा आहे. बापूराव विजापुरे यांनी दिलेली पहिली संधी, "मोरूची मावशी'साठीचे निरीक्षण व शिक्षण याचबरोबर यशवंत दत्त या आपल्या बलाढ्य प्रतिभेच्या सहकाऱ्याच्या आठवणींनांही त्यांनी उजाळा दिला. व्यावसायिक रंगभूमीवरील त्यांची वैभवी वाटचाल मात्र मुंबईत झाली. 

टीव्हीवरून थेट हिंदी चित्रपटांमधला त्यांचा प्रवेश अधिकारी बंधूंमुळे "भूकंप'मधून झाला आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. मात्र त्याच त्याच एकसुरी भूमिकांचा वीट येऊन त्यांनी हिंदी पडद्याला रामराम ठोकला, हेही त्यांनी खुलवून सांगितले. अमिताभ बच्चन यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त शुभेच्छा देताना ते म्हणाले, की माणूस म्हणूनही ते तेवढेच आदरणीय आहेत. 

मराठी नाटक व चित्रपटांत नव्या ऊर्जेचे नवनवे कसदार आविष्कार घडताना दिसत आहेत, हे आश्‍वासकच आहे. मात्र, शासनाकडूनही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राला जे सकारात्मक पाठबळ मिळणे आवश्‍यक आहे. त्याचा प्रचंड अभाव व अनास्था असल्याचे अत्यंत परखड मत त्यांनी नोंदवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China Fireworks Factory Explosion : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 21 कामगारांचा होरपळून मृत्यू, 61 जण जखमी, आकाशात धुराचे प्रचंड लोट

"मला पुन्हा सांगू नका की..." जसप्रीत बुमराहच्या 'त्या' चुकीवर सुनील गावसकर भडकले; नेमकं काय घडलं?

Mumbai: तीन अल्पवयीन मुलांकडून तरुणावर हल्ला, डोक्यात अडकलेला कोयता घेऊन तरुण रुग्णालयात; भीषण दृश्य समोर

Solapur Protest: बालिकेवरील अत्याचाराविरोधात सोलापूरकर रस्त्यावर, नसरापूर घटनेचा निषेध, नागरिकांचा कॅंडल मार्च..

Latest Marathi News Live Update : सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नसरापूर घटनेचा निषेध

SCROLL FOR NEXT