baramati sakal
पुणे

Pune News : लेकराच्या जिवासाठी मातेने केले किडनीदान...

कोईमतूर येथील एका रुग्णालयात हे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला.

- मिलिंद संगई

बारामती - मुलांच्या प्राणांसाठी आई आपल्या जीवाचीही बाजी लावू शकते, असे नेहमी म्हटले जाते. बारामतीतील जळोचीमध्ये याचा प्रत्यय आला. दोन्ही किडन्या निकामी झालेल्या जळोचीतील हनुमंत भाऊ सूळ (वय 27) याला किडनी प्रत्यारोपणाची निकड होती. सातत्याने प्रयत्न करुनही या साठी किडनी दाता मिळत नसल्याने अखेर मुलाच्या जीवाच्या काळजीपोटी आई श्रीमती शालन सूळ यांनी स्वताःचीच किडनी त्याला देण्याचा निर्णय घेतला होता.

मुलाला किडनी मिळाली नाही तर त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो याची जाणीव झाल्याने शालन सूळ यांनी तातडीने कोईमतूर येथील एका रुग्णालयात हे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला.

ही शस्त्रक्रीया यशस्वी झाली व हनुमंत सूळ याला त्याच्या आईनेच नवीन जीवन प्राप्त करुन दिले. पतीचे निधन झालेले व मुलाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे संकट पेलत शालन यांनी मोठ्या धैर्याने या परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. अविनाश सूळ यांनी जळोचीमधील सामाजिक कार्यकर्ते अँड. अमोल सातकर यांच्या मदतीने कोईमतूरला जात पुढील प्रक्रीया पार पाडली. नुकतीच ही शस्त्रक्रीया झाली असून त्या साठी जवळपास 15 लाखांचा खर्च झाला आहे. सामान्य परिस्थितीतील या कुटुंबाला आर्थिक मदतीची मोठी गरज आहे. मुलाच्या जिवासाठी आईने फक्त आर्थिक जुळवाजुळवच केली नाही तर स्वताःची किडनी देत ममत्वाची प्रचिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT