पुणे

‘दोषी एजन्सींवर फौजदारी दाखल करू’

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘‘वीजमीटरचे रीडिंग घेण्याबरोबरच बिलवाटपासाठी नेमण्यात आलेल्या २९ खासगी एजन्सीज्‌पैकी काहींनी ग्राहकांकडून चुकीची आणि वाढीव बिले आकारल्याचे निदर्शनास येत आहे. अशा एजन्सींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. यासंबंधीच्या सूचना आणि आदेश कार्यकारी आणि अधीक्षक अभियंत्यांना दिले आहेत,’’ अशी माहिती पुणे परिमंडलचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांनी ‘सकाळ’ला दिली.

ते म्हणाले, ‘‘कोथरूड, वारजे परिसरातील ग्राहकांना वेळेत वीजबिले पोचविण्याचे आदेश संबंधित एजन्सीला दिले आहेत. बिल भरणा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांनीही ग्राहकांना चांगली सुविधा द्यावी. नागरिकांच्या तक्रारी वेळेत सोडवाव्यात. दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महावितरणतर्फे खासगी एजन्सीच्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात येते. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, त्यांना वाढीव बिले जाऊ नयेत, यासाठी आवश्‍यक ती दक्षता घेण्याचे आदेशही एजन्सीला दिले आहेत.’’

‘‘पुणे शहरात महावितरणचे २७ लाख ग्राहक आहेत. त्यांच्यासाठी ऑनलाइन बिलाची सोय केली आहे, परंतु साधारणतः सात लाख नागरिकच ऑनलाइन बिले भरतात. नागरिकांनी ऑनलाइन सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

‘रीडिंग’ची तपासणी करून घ्या
वीज ग्राहकांच्या मीटरचे हेतुपुरस्सर निष्काळजीपणे रीडिंग घेणाऱ्या एजन्सींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. एजन्सीने रीडिंग घेतलेल्या दिवशीच महावितरणकडून त्याची तपासणी करून घ्यावी, अशी सूचनाही महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

Raigad Heavy Rain : पाऊस आला धावून, अन् रस्ते गेले वाहून; रायगड जिल्ह्यात रस्ते व महामार्गांची दूरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात

IND vs ENG 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला! ज्याच्यामुळे मागची मॅच हरली, त्याला केले संघाबाहेर; बघा कशी आहे Playing XI

Vasai Virar Local Stop : पावसापुढे रेल्वेची पुन्हा शरणागती; १२ तासांत दुसऱ्यांदा वसई-विरार लोकल ठप्प! लाखो प्रवासी अडकले

Nagpur Crime : ‘एआय’ तंत्रज्ञानाने शोधला निर्घृण मारेकरी; वृद्धेवरील अत्याचार व खुनाचा झाला उलगडा

SCROLL FOR NEXT