pune
pune sakal
पुणे

Pune News : मुस्लिम बांधवांकडून इस्त्राइलकडून पॅलेस्टाईनवर होणाऱ्या हवाई हल्ल्यांचा निषेध; मराठा आरक्षणाला पाठिंबा.

डी. के. वळसे पाटील, मंचर

मंचर - इस्राईल देशाकडून सतत गाझापट्टी-फिलिस्तीनवर हवाई हल्ले होत आहेत. निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. तेथील नागरिक भयभीत झाले आहेत. मंचर (ता.आंबेगाव) शहरात मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढून इस्राईलच्या हुकुमशाही वृत्तीचा निषेध व्यक्त केला. यावेळी मुस्लीम बांधवांच्या भावना तीव्र होता. यावेळी भारताचा तिरंगा हातात घेऊन ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अश्या घोषणा देण्यात आल्या.

जुम्मा मज्जीद-मारुती मंदिर चौकापासून बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चा आला.तेथे झालेल्या निषेध सभेत मुस्लीम समाजाचे नेते राजू इनामदार म्हणाले “अंतराष्ट्रीय कराराचा भंग पायदळी तुडविण्याचे काम इस्राईल करत आहे.सतत रुग्णालये व सर्वाजानिक ठिकाणी बॉम्ब हल्ले केले जातात.हा प्रकार ताबडतोब थांबविण्याची गरज आहे.”

मोर्चाचे नेतृत्व हाजी मन्सूर पठाण, अल्लु इनामदार,रहेबर मीर,इरफान काझी, मौलाना वसीम जयदी,अमानत मीर, मन्सूर शेख, हैदर मिर्झा, अली हसन इनामदार आदींनी केले. मोर्चात मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता. त्यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती. मुस्लिम बांधवांच्या हातात निषेधाचे फलक होते. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. मराठा आरक्षण आंदोलनाला मुस्लिम बांधवांचा पाठिंबा असल्याचे यावेळी राजू इनामदार यांनी जाहीर केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Result : भिस्त असलेल्या मतदारसंघाने पुन्हा दिली साथ; मुरलीधर मोहोळ यांच्या विजयात उचलला मोलाचा वाटा

Ajit Pawar Faction: अजित पवारांच्या बैठकीला 4 आमदारांची अनुपस्थिती, लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादीत अस्वस्थता असल्याची चर्चा

Rahul Gandhi on Stock Market : "खोटे एक्झिट पोल दाखवायला सांगून मोदींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सांगितली"; राहुल गांधींचा गंभीर आरोप

IND vs PAK : आमचं हॉटेल बदलून द्या! पीसीबीनं भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी आयसीसीला भरला दम

Latest Marathi News Live Update: नांदगावमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT