एनडीए - सलग तीन वर्षांच्या सोबतीतून झालेल्या जिवलग मैत्रीसाठी एक सेल्फी तो बनता है...
एनडीए - सलग तीन वर्षांच्या सोबतीतून झालेल्या जिवलग मैत्रीसाठी एक सेल्फी तो बनता है...  
पुणे

गार वारा, निःशब्द शांतता अन्‌ शिस्तबद्ध संचलन

सकाळवृत्तसेवा

पुणे - पहाटेच्या गार वाऱ्यात पसरलेल्या निःशब्द शांततेत ‘हम एनडीए के कॅडेट हैं’ ही सुरावट बॅंडवर सुरू झाली आणि शिस्तबद्ध संचलन करत एक-एक तुकडी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) खेत्रपाल संचलन मैदानावर दाखल झाली. ‘सारे जहाँ से अच्छा’, ‘देशोंका सरताज भारत’च्या तालावर लयबद्ध संचलन करीत विद्यार्थ्यांनी ‘अंतिम पग’ची पायरी ओलांडली आणि तीन वर्षांचे खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण झाले. टाळ्यांचा कडकडाट होत असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानवंदना देत एक-एक पाऊल पुढे टाकत मनोज पांडे ब्लॉकमध्ये पोचलेल्या विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. निमित्त होते ते ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’च्या १३३ व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनाचे...

किरगीझ प्रजासत्ताकच्या लष्करातील ‘चिफ ऑफ जनरल स्टाफ’ मेजर जनरल राईमबर्दी दुईशोनबिएव दीक्षान्त संचलनाचे प्रमुख पाहुणे होते. या वेळी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख पी. एम. हॅरिस आणि ‘एनडीए’चे प्रमुख एअर मार्शल जे. एस. क्‍लेर उपस्थित होते. भारताच्या तिरंग्यासह ‘एनडीए’चा ध्वज फडकावीत मैदानावरून जाणाऱ्या हेलिकॉप्टरने दिलेल्या मानवंदनेतून सर्व वातावरण भारावून गेले. 

‘सेवा परमो धर्मः’चे ब्रीद घेऊन गेली तीन वर्षे खडतर प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे दिमाखदार संचलन पाहण्यासाठी पालक, नातेवाईक आले होते. तसेच, आशीर्वाद देण्यासाठी अभिनेते नाना पाटेकरदेखील उपस्थित होते. 
दुईशोनबिएव यांनी संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. अर्जुन ठाकूर याला राष्ट्रपतींच्या सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. राहुल बिष्ट याला रौप्य, तर शशांक शेखर याला ब्राँझपदक देऊन गौरविण्यात आले. ‘एन’ स्क्वॉडर्नला ‘द चिफ ऑफ स्टाफ बॅनर’ प्रदान करण्यात आला. दुईशोनबिएव यांनी संवाद साधताना ‘एनडीए’तील अत्यंत कठीण प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

भारतीय हवाई दलाची मदार असलेल्या सुखोई (सु ३० एमकेआय) ही स्वनातीत वेगाने हवेत झेपावणाऱ्या लढाऊ विमानांनी ‘एनडीए’च्या सुदान ब्लॉकवरून भरारी घेत संचलनाला मानवंदना दिली. त्या पाठोपाठ आलेल्या मिराज विमानानेही उपस्थितांचे लक्ष वेधले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT