wada sakal
पुणे

Pune News : नेताजी पालकरांचा ऐतिहासिक वाडा आज मोजतोय अखेरच्या घटका

पुणे जिल्ह्यातील तांदळी ( ता. शिरूर ) येथील पालकरांच्या वाड्याची पडझड; वाड्यात उगवल्या काटेरी बाभळी

दत्तात्रेय कदम

मांडवगण फराटा - छत्रपती शिवाजी महाराजांचे सरलष्कर नेताजी पालकर यांचा तांदळी येथील ऐतिहासिक वाडा आज अखेरच्या घटका मोजत आहे. या ऐतिहासिक वाड्याच्या भिंतींची पडझड झाली असून सर्वत्र काटेरी बाभळींचे साम्राज्य पसरले आहे.

या ऐतिहासिक वारशाचे शासनाच्या पुरातत्त्व विभागाने संरक्षण व संवर्धन करावे अशी मागणी येथील इतिहास प्रेमी चेतन मचाले, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे व तांदळी येथील ग्रामस्थांनी केली आहे. नेताजी पालकर यांचे काही वंशज तांदळी येथे तर काही वंशज अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी ( ता. श्रीगोंदा) येथे वास्तव्यास असून त्यांच्या, ग्रामस्थांच्या तसेच शासनाच्या समन्वयातून येथे नेताजींचे भव्य स्मारक उभारावे अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.

नेताजी पालकर यांचा जन्म १६२० तर मृत्यू १६८१ मध्ये झाला. नेताजी पालकर हे दीर्घ काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सरनौबत होते. त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दुसरा शिवाजी' असेही म्हटले जायचे. नेतोजी हे मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तांदळीचे परंतु त्यांचे वडील रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे स्थायिक झाले होते.

नेताजींचा जन्म खालापूर येथील चौक या गावी झाला. त्यांनी अनेक युद्धे गाजवली होती. अफजलखानाच्या वधाच्या वेळी अफजलखानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेतोजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. मात्र पुरंदरच्या तहानंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी वादविवादाचा बनाव करून त्यांना मोगलाकडे पाठविले,

त्यांनी आदीलशहावर आक्रमन केले. मुघलांनी त्यांचे धर्मांतर केले. नेतोजींना अरबस्तानात पाठविले. तसेच त्यांना नजरकैदेत ठेवले. यामुळे ते स्वराज्यापासून दूर होते.

त्यांनी मुघलांची चाकरी केली, पण नऊ वर्षांनी नेतोजी पुन्हा स्वराज्यात आले. पण स्वराज्यात पुन्हा आल्यावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधी पार पाडून त्यांना परत हिंदू धर्मात प्रवेश दिला होता.

अशा महान पराक्रमी नेताजी पालकर यांच्या या ऐतिहासिक वाड्याचे पुनरुज्जीवन करुन येथे नेताजींचे स्मारक उभारावे अशी मागणी तांदळी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दरवर्षी बाळंतपण! वंशाला हवेत दोन दिवे; पाचव्यानंतर सहावं पोटात, डॉक्टरने पती-पत्नीला झापझाप झापलं; व्हिडीओ व्हायरल

'सुनेला सासरी जुळवून घे...' म्हणणं क्रूरता नाही; सुप्रीम कोर्टाचे मोठे निरीक्षण, वैवाहिक वादांत कायद्याचा गैरवापर टाळा

IPL 2026: Mumbai Indians च्या अपयशानंतर हार्दिक पांड्यानं उचललं मोठं पाऊल; जगभरातील चाहत्यांना बसला धक्का, नेमकं काय केलं?

Metro Lines 5A and 12A: कल्याण-नवी मुंबई प्रवास आणखी सोपा होणार! MMRDA नवे मेट्रो नेटवर्क उभारणार; मार्ग कसा असणार?

Pune Car Accident : पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार; दारूच्या नशेत 19 वर्षीय तरुणाने भरधाव चालवली कार, गाडी थेट गरवारे पुलावरून कोसळली खाली

SCROLL FOR NEXT