पुणे

लाल-पिवळ्या बस होणार आता निळ्या 

सकाळवृत्तसेवा

पुणे - "पीएमपी'च्या बस म्हणजे लाल-पिवळा रंग, असे गेल्या 69 वर्षांपासून दृढ झालेले समीकरण बदलणार असून, यापुढे सर्व बस निळ्या रंगात पाहायला मिळणार आहेत. प्रवाशांच्या आग्रहास्तव बसचा रंग बदलण्याचा निर्णय पीएमपी प्रशानसाने घेतला आहे. 

पीएमपीच्या ताफ्यात सुमारे 2 हजार 200 बस आहेत. या सर्व बसचा रंग बदलण्यात येणार आहे. तसेच नव्याने येणाऱ्या 200 मिडी बसही निळ्या रंगसंगतीमध्ये असतील, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बसचा रंग बदलायचा असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते. त्या बाबतची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे, असे त्यांनी सांगितले. 

बसच्या रंगसंगतीबाबत पीएमपी प्रशासनाने गेल्या वर्षी नागरिकांकडून सूचना मागविल्या होत्या. त्यात बहुसंख्य नागरिकांनी पीएमपीच्या बसचा सध्याचा रंग बदलून नवा रंग देण्यात यावा, असे सुचविले होते. त्याअंतर्गत काही प्रवाशांनी निळा रंगही सुचविला होता. त्यानुसार बसला बाहेरून निळा रंग देण्याची प्रक्रिया सुमारे 15 दिवसांपूर्वी सुरू झाली आहे. सध्या सुमारे 300 बसचा रंग बदलण्यात आला आहे. येत्या महिनाभरात सर्व बस निळ्या रंगात दिसतील, असेही संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

पीएमपीमध्ये 1948 पासून बसचा रंग लाल-पिवळ्या स्वरूपाचा आहे. मध्यंतरी सीएनजीवरील 500 बस नव्या आल्या. त्यात पांढरा-हिरवा रंग होता. परंतु लाल-पिवळ्या रंगाचाही समावेश त्यात होता. या पार्श्‍वभूमीवर आता सर्व बसला निळा रंग देण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT