Manja 
पुणे

नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर पोलिस कारवाई सुरू

सकाळवृत्तसेवा

पुणे - राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातलेला चिनी नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर पोलिसांनी छापे घालण्यास सुरवात केली आहे. गुन्हे शाखेची सात पथके विक्रेत्यांवर कारवाई करत आहेत.

चिनी नायलॉन मांजा गळ्याभोवती अडकून मागील आठवड्यात झालेल्या अपघातामध्ये "सकाळ'च्या कर्मचारी सुवर्णा मुजुमदार या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचार सुरू असताना रविवारी त्यांचे निधन झाले. या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांनी पतंग उडविणाऱ्या मुलांसह त्यांच्या पालकांकडे चौकशी केली होती, तर सोमवारी मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरवात केली.

गुन्हे शाखेच्या पथक क्रमांक तीनचे सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, ""शहराच्या विविध भागांमध्ये बंदी असूनही चिनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. गुन्हे शाखेची सात पथकांची नेमणूक केली आहे. बंदी असलेल्या मांजाची विक्री करणाऱ्यांवर ही कारवाई करण्याचे काम सुरू आहे. शहराच्या विविध भागांमध्ये ही कारवाई सुरू आहे. शहर पातळीवर किती विक्रेत्यांवर कारवाई झाली, याविषयीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT