Pune News Old palace catches fire due to firecrackers in Peth on Friday Fire incidents at 10 places knp94 
पुणे

Pune News: शुक्रवार पेठेत फटाक्यामुळे जुन्या वाड्याला आग; 10 ठिकाणी आगीच्या घटना

पुण्यातील शुक्रवार पेठेत फटाक्यामुळे जुन्या वाड्याला आग लागली आहे. वाडा लाकडी असल्यामुळे फटाक्यांच्या ठिणग्यांनी रौद्ररूप धारण केलं.

कार्तिक पुजारी

पुणे- पुण्यातील शुक्रवार पेठेत फटाक्यामुळे जुन्या वाड्याला आग लागली आहे. वाडा लाकडी असल्यामुळे फटाक्यांच्या ठिणग्यांनी रौद्ररूप धारण केलं. सुदैवाने या वाड्यात कोणीही वास्तव्यास नव्हते. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या निमित्ताने काही नागरिक याच वाड्याच्या परिसरात फटाके फोडत होते. याच फटाक्यांमुळे लाकडी वाड्याला आग लागली. पुण्यात फटाक्यांच्या कारणाने १० ठिकाणी आगीच्या घटना घडल्याची माहिती आहे. गॕलरीत, टेरेसवर पेट घेण्यासारख्या वस्तू ठेवू नका असं आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात येतंय.

दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात आहेत. पण, यामुळे अनेक ठिकाणी आगीच्या घटना समोर आल्या आहेत. पुण्यातील अग्निशमन दलाच्या एका केंद्रालाच आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने आग विझवण्यात यश आलं आहे. सोलापूरातील बार्शीमध्येही राजवाडा हॉटेलला आग लागली होती. अग्निशमन दलाने आग विझवली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT