alephata  sakal
पुणे

Pune News : एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवावा -आळेफाटा पोलीस स्टेशन

सी सी.टि.व्ही.कॅमेरा लावावेत तसेच चोवीस तास स्वयंसेवक उपस्थित राहतील याची काळजी घ्यावी

सकाळ वृत्तसेवा

राजेश कणसे

प्रत्येक गावातील गणेश मंडळांणी एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवावा असे आवाहन आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांणी आळेफाटा या ठिकाणी केले

आळेफाटा(ता.जुन्नर)येथील पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावांमधील सरपंच ,उपसरपंच,ग्रामपंचायतीचे सदस्य, सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी,पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सौभद्र मंगल कार्यालयात घेण्यात आली त्या प्रसंगी उपस्थितांणा मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी नलावडे म्हणाले की सर्व गणेश मंडळांनी ऑनलाईन परवानगी घेणे बंधनकारक आहे सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे सर्वांनी त्या पद्धतीने नियोजन करून शांततेत गणेश उत्सव पार पाडावा.तसेच ज्या गावांमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवणाऱ्या मंडळास तसेच पारंपरिक वाद्यांच्या तसेच पर्यावरण पूरक गणेश उत्सव मंडळ सामाजिक सलोखा राखणारे गणेश मंडळे हिंदू मुस्लिम एकोपा जपणा-या मंडळांना उत्कृष्ट मंडळे निवडून योग्य ते बक्षीस देण्यात येणार आहे.

शक्यतो सर्व मंडळांणी सार्वजनिक गणपती जवळ सी सी.टि.व्ही.कॅमेरा लावावेत तसेच चोवीस तास स्वयंसेवक उपस्थित राहतील याची काळजी घ्यावी सर्व गणेश मंडळांणी स्थापना मिरवणुक व विर्सजणाच्या वेळी पारंपारिक वाद्याचा वापर करणे बंधन कारक असुन सर्वांनी गणेश मूर्तीची उंची मर्यादित ठेवावी .तसेच गणेश उत्सवाच्या काळात कुठल्याही प्रकारचा अनुसुचित प्रकार घडु नये यासाठी सर्वांणी काळजी घेऊन पोलीसांणा सहकार्य करावे असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT