पुणे

पॅथॉलॉजी लॅब होताहेत "डिजिटल' 

सकाळवृत्तसेवा

पुणे - विविध प्रकारच्या आजारांचे निदान करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या रक्त व लघवीच्या चाचण्या करणाऱ्या "पॅथॉलॉजी लॅब' आता डिजिटल होऊ लागल्या आहेत. केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागातील 70 टक्के लॅब आता अत्याधुनिक लॅब मॅनेजमेंट सॉफ्टवेअर वापरत असून, त्यामुळे डॉक्‍टर व रुग्णांना फायदा होत आहे. 

दरवर्षी 15 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय पॅथॉलॉजी दिन म्हणून साजरा केला जातो. शहरी व ग्रामीण भागातील पॅथॉलॉजी लॅबमधील ट्रेंड आता बदलत आहे. "इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट'च्या सचिव आणि बी. जे. मेडिकल कॉलेजच्या पॅथॉलॉजी विभागाच्या वरिष्ठ सहयोगी प्राध्यापक डॉ. शारदा राणे यांनी या बदलत्या ट्रेंडविषयी माहिती दिली. 

डॉ. राणे म्हणाल्या, ""पॅथॉलॉजी लॅबचे डिजिटायझेशन झाल्यामुळे रुग्णांना मोठा फायदा झाला आहे. सर्व चाचण्यांचे अहवाल डिजिटल स्वरूपात असल्यामुळे आता "सेकंड ओपिनियन' घेणे सहजसोपे झाले आहे. विशेषतः अनेक आजार, रोगांच्या निदानाबाबत दुमत असल्यास अगदी परदेशातील तज्ज्ञ डॉक्‍टरांचेही मत घेणे शक्‍य झाले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागात लॅब सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही डिजिटल स्वरूपातील अहवालांमुळे तज्ज्ञ आणि वरिष्ठांकडून सल्ला घेता येत आहे.'' 

"इलेक्‍ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड'च्या क्षेत्रात काम करणाऱ्या "जेनेक्‍स ईएचआर' या स्टार्टअपचे संस्थापक मुकुल मुस्तिकर म्हणाले, ""लॅब मॅनेजमेंट सॉफ्टवेअर हे लॅबचालकांच्या सोयीचे असेल, तर तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास उशीर होत नाही. पूर्वी उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर वापरताना अनेकदा लॅब चालकांना अडचणी येत व तांत्रिक मदतीची गरज पडत असे. मात्र आता क्‍लाऊड तंत्रज्ञानामुळे या अडचणी दूर झाल्या आहेत. लॅब मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा वापर शहरी भागांच्या इतकाच ग्रामीण भागातही होत असल्याचे आम्ही पाहत आहोत. सॉफ्टवेअरच्या लोकप्रियतेमागे रुग्णांना वेळेवर आणि अचूक अहवाल देणे तसेच वेळेची बचत ही दोन प्रमुख कारणे आहेत.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasai Virar Local Close : वसई विरार दरम्यान लोकल बंद; ट्रॅक्टरवाल्यांचा भाव वधारला, तालुक्यातील अनेक ठिकाणची वीज गायब

२२ दिवस चालत गेल्यावर विठ्ठलाकडे काय मागणार? संदीप पाठकला वारकरी आजोबांनी काय उत्तर दिलं? म्हणाला, 'डायरेक्ट दर्शन घेणाऱ्या मला...'

Wardha Tiger Safari: व्याघ्र सफारीसाठी गिरड–खुर्सापार जंगलात चराईबंदी; सहा गावांतील शेकडो पशुपालकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

अमरावतीत पुन्हा बिबट्याची दहशत, पीडीएमसी परिसरात दिसल्या पाऊलखुणा, वनविभागाकडून शोधमोहीम

राजुरा हत्याकांड प्रकरण पोलिसांसाठी लाजिरवाणी बाब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत कबुली, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT