pmp sakal
पुणे

Pune News : ‘पेमेंट गेट वे’च्या प्रस्तावाला मंजुरी बाकी; लाइव्ह लोकेशन कळणार; ॲपवर मिळणार ‘पीएमपी’चे तिकीट

‘पीएमपी’चा डिजिटल प्रवास सुरू झाला आहे. मागील महिन्यात क्यूआर कोड सेवेचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘पीएमपी’ गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल ॲप सुरू करण्याच्या प्रयत्नात होती. अखेर या प्रयत्नाला यश आले आहे. प्रवाशांना लवकरच मोबाईलवर तिकीट काढणे शक्य होणार आहे. शिवाय, बसचे लाइव्ह लोकेशनही समजेल. पुढील आठवड्यात या ॲपचा डेमो घेण्यात येईल. तसेच ‘पेमेंट गेट वे’साठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच प्रवाशांना ऑनलाइन तिकीट काढता येईल.

‘पीएमपी’चा डिजिटल प्रवास सुरू झाला आहे. मागील महिन्यात क्यूआर कोड सेवेचे उद्‍घाटन झाले. त्यामुळे प्रवाशांना आता ‘क्यूआर कोड’चा वापर करून तिकीट काढता येत आहे. मोबाईल ॲप वरून तिकीट काढण्याची सेवा मिळावी, अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रवाशांची मागणी आहे. त्यासाठी अनेकदा प्रयत्न केले गेले. मात्र, यश आले नाही. आता ॲपचे काम पूर्ण झाले आहे. आवश्यक त्या चाचण्याही झाल्या आहेत. बँकेकडून ‘पेमेंट गेट वे’साठी मंजुरी मिळताच प्रवाशांना मोबाईलवरूनच तिकीट काढता येईल. या ॲपद्वारे प्रवाशांना बसची लाइव्ह माहितीही मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आपल्या वेळेचे नियोजन करता येईल.

‘पीएमपी’च्या ॲपचे काम पूर्ण झाले आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून ‘पेमेंट गेट वे’च्या प्रस्तावाला मंजुरी मिळताच प्रवाशांना ॲपद्वारे तिकीट काढता येईल. शिवाय, ॲपवरील अन्य सुविधांचाही लाभ घेता येईल.

- नितीन नार्वेकर,

सह-व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी, पुणे.

बसचे लाइव्ह लोकेशन

‘पीएमपी’च्या बसचे लाइव्ह लोकेशन समजावे म्हणून ‘गुगल’ च्या सूचनेवरून बस थांब्याचे व बस मार्गाचे मॅपिंग करण्याचे काम पूर्ण झाले आहे. ‘पीएमपी’च्या वाहतूक शाखेच्या विशेष पथकाने मागील सहा महिन्यांपासून यासाठी डेटा गोळा करण्याचे काम केले. शिवाय, एका खासगी संस्थेकडून लॅटिट्यूड (अक्षांश व रेखांश) निश्चित करण्याचे कामही झाले आहे. सुमारे १,५०० बस थांबे व ५८० मार्गांचे मॅपिंगचे काम पूर्ण झाले. अॅप सुरू होताच प्रवाशांना आपल्या मार्गांवरील बसची माहिती मोबाईलवर मिळेल.

दृष्टिक्षेपात

४,६७४

‘पीएमपी’चे एकूण थांबे

१३ लाख

रोजचे प्रवासी

९८०

एकूण मार्ग

१,५००

मॅपिंग झालेले थांबे

५८०

मॅपिंग झालेले मार्ग

सुमारे

दीड कोटी

रोजचे उत्पन्न

१,२००

शेड असलेले थांबे

(डेटा गोळा करण्यासाठी मागील सहा महिन्यापासून ५५ हजार फेऱ्यांची माहिती संकलित)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT